अजगराला पाहून मोठमोठे प्राणीही धूम ठोकतात, अशात इवल्याशा बेडकाला अजगरावर बसून सवारी करताना पाहून कोणीही हैराण होईल. आपल्या पाठीवर बेडूक बसल्याची जराही चाहूल अजगराला लागली असती तर बेडकाचं वाचणं अशक्यच होतं. बेडकाला आपला जीव गमावून या सवारीची किंमत चुकवावी लागली असती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक भलामोठा अजगर झाडींमधून सरपटत चालल्याचं दिसतं. या अजगराच्या पाठीवर एक बेडूक बसलेलं आहे आणि सवारीची मजा घेत आहे. कदाचित या बेडकाला याची कल्पनाही नाही की ज्याच्या पाठीवर तो बसला आहे तो अजगर क्षणात त्याचं जीवन संपवू शकतो. कारण अजगरापुढे हरण आणि बकरीसारखे मोठे प्राणीही हार मानतात. अस्वलाची शिकार करायला गेला वाघ; विचारही केला नसेल असा झाला शेवट; पाहा VIDEO हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर fnybitch नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, ही बेडकाची शेवटची सवारी असेल. तर आणखी एकाने लिहिलं, लढाईत सापाची सवारी करताना बेडूक.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python snake, Shocking video viral