मुंबई, 04 जानेवारी : वाघ (Tiger) अगदी हुशारीने आपली शिकार पकडतो. जो वाघाची (Tiger attack) शिकार होणार त्याला समजण्याच्या आताच तो त्याच्यावर हल्ला करतो. एकदा का वाघाच्या (Tiger video) तावडीत सापडलं की मग मात्र त्या प्राण्याची (Animal video) सुटका होणं अशक्यच. पण शिकारीत प्रत्येक वेळी वाघाला यश मिळेलच असं नाही. सध्या अशी शिकार करायला गेलेल्या वाघाची कशी फजिती झाली (Tiger attack on bear), याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अस्वलाची (Bear video) शिकार करायला गेलेल्या वाघाला (Tiger bear video) स्वतःचाच जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. अस्वलावर (Bear tiger video) हल्ला करणं त्याला चांगलंच महागात पडलं. आपला जीव मुठीत धरून वाघ वाऱ्याच्या वेगाने पळत सुटला. हे वाचा - बदकाची शिकार करण्यासाठी आले 4 वाघ; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही, VIDEO व्हिडीओत पाहू शकता वाघ आणि अस्वल दिसत आहे. रस्त्यावर अस्वल दिसताच वाघाने त्याच्यावर हल्ला केला. आपल्या दोन्ही हातांनी अस्वलाला धरून त्याची मान आपल्या जबड्यात धरली. पण तरी अस्वल घाबरलं नाही. त्यानेही वाघाशी जबरदस्त फाइट केली. एका क्षणात त्याने बाजी पलटवली. त्याने वाघावर हल्ला केला. त्याने वाघाला पुन्हा स्वतःवर हल्ला करण्याची संधीच दिली नाही.
#ViralVideo
— Bosky Khanna (@BoskyKhanna) December 31, 2021
Guess who won the fight.@NPbannerghatta @Bandipur_TR @nagaraholetr @brt_tiger @kudremukh_wild @aranya_kfd @moefcc @ntca_india @wiiofficial1 @byadavbjp @UMESH_V_KATTI @wildmysuru @Amitsen_TNIE @ParveenKaswan @ifs_yedukondalu @surenmehra @mahesh_ifs @CentralIfs pic.twitter.com/S7lHBxDE1S
अस्वलाचं रूप पाहून वाघही बिथरतो. अस्वलापासून तो लगेच मागे होतो. आपली शिकार करायला आलेल्या वाघाच्याच मागे अस्वल लागतं आणि मग काय वाघ भीतीने तिथून धूम ठोकतो. तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटतो. अस्वलाची शिकार करायला आला पण त्याच्यावर स्वतःचाच जीव वाचवण्याची वेळ आली. कसाबसा करून तो अस्वलाच्या तावडीतून सुटला. शेवटी थकून तो पाण्यात बसून आराम करताना दिसतो. हे वाचा - पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडलं जिराफ; शेवट पाहून पाणावतील डोळे, VIDEO @BoskyKhanna नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या लढाईत कोण जिकलं, याचा अंदाज बांधा, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.