जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जन्मापासूनच एकदाही हसली नाही ही 24 वर्षीय तरुणी; कारण जाणून व्हाल शॉक

जन्मापासूनच एकदाही हसली नाही ही 24 वर्षीय तरुणी; कारण जाणून व्हाल शॉक

जन्मापासूनच एकदाही हसली नाही ही 24 वर्षीय तरुणी; कारण जाणून व्हाल शॉक

24 वर्षीय टायलाचा जन्म मॉयबियस सिंड्रोमसोबत झाला (Moebius syndrome). या कारणामुळे टायला कधीच हसू शकत नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 04 जानेवारी : जगभरात अनेक प्रकारचे विविध आजार (Weird Diseases) पाहायला मिळतात. यात काही आजार हे अतिशय दुर्मिळ (Rare Disease) असतात. जे जगातील अगदी मोजक्याच लोकांना होतात. या लोकांना पाहून विश्वासही बसत नाही की खरंच या परिस्थितीचाही कोणाला सामना करावा लागत असेल. न्यूझीलंडमध्ये राहणारी टायला नावाची तरुणीही अशाच एका आजाराचा सामना करत आहे. आपल्या आजारामुळे एकेकाळी लोकांच्या मस्करीचा विषय ठरलेली टायला आणि प्रसिद्ध झाली आहे. लोक तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी येतात. जुळ्यांच्या जन्माने रचला इतिहास, पहिला जन्मला 2021 मध्ये तर दुसरा 2022 साली 24 वर्षीय टायलाचा जन्म मॉयबियस सिंड्रोमसोबत झाला (Moebius syndrome). या कारणामुळे टायला कधीच हसू शकत नाही. कधीही हसत नसल्याने लोक टायलाला नावं ठेवायची आणि तिची मस्करी करायची. मात्र सध्या टायला पॅरालिंपिक रेकॉर्ड होल्डर आहे. जन्मापासूनच या सिंड्रोममुळे ती हसू शकत नाही. ज्या आजाराने टायला ग्रस्त आहे, तो 40 लाखात एखाद्याच व्यक्तीला असतो. या आजारामुळे माणूस हसू शकत नाही. इतकंच नाही तर तो व्यक्ती आपल्या भुवयांची हालचालही करू शकत नाही. यासोबत आपला वरच्या बाजूचा ओठही हे लोक हलवू शकत नाहीत. या आजारामुळे चेहऱ्याच्या मसल्सवर परिणाम होतो. याच कारणामुळे माणूस आपल्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकत नाही. या आजारावर काहीही उपचार नाही.

गोष्टीतल्या ‘ससा-कासवाची शर्यत’ प्रत्यक्षात; या स्पर्धेत कोण जिंकलं तुम्हीच पाहा

कधीही हसू शकत नसल्याने टायलाला लहानपणापासूनच लोकांचं बोलणं ऐकावं लागत असे. मात्र आज ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ठरली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. आपली या परिस्थितीबद्दल बोलताना ती सांगते, की हसू न शकणं हे तिच्यासाठी सर्वात मोठं वरदान ठरलं आहे. ती आपल्या आयुष्यामुळे आणि दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेरणेमुळे अतिशय आनंदी आहे. टायलाच्या पालकांनी अनेकदा सर्जरीच्या माध्यमातून तिच्या चेहऱ्यावरील हावभाव परत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले. मात्र, आता टायला आपल्या या आजारासोबतच आनंदी आहे. आता ती आपल्यासारख्या लोकांना प्रेरणा देण्याचं काम करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात