जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कोरोना सोडा हे त्याहूनही जास्त भयंकर! तुमच्या आरोग्याशी कसा होतोय खेळ, पाहा VIDEO

कोरोना सोडा हे त्याहूनही जास्त भयंकर! तुमच्या आरोग्याशी कसा होतोय खेळ, पाहा VIDEO

कोरोना सोडा हे त्याहूनही जास्त भयंकर! तुमच्या आरोग्याशी कसा होतोय खेळ, पाहा VIDEO

एकीकडे कोरोना व्हायरस जगभरात पसरतो आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च: एकीकडे जगभरात कोरोनाचं संकट असताना फेसबूकवर एक भयानक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तुम्ही जर रस्त्यावर गाड्यावरचं फास्ट फूड खात असालं तर हा व्हिडीओ तुमची झोप उडवणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातो आहे. व्हिडीओमध्ये रस्त्याकडेला छोले–भटूरेची गाडी लागली आहे. ही गाडी अगदीचं नाल्यावर आहे. या नाल्याच्या पाण्यात एक तरूण छोले भटूरेच्या प्लेट्स धुताना दिसतो आहे आणि याच प्लेटमध्ये छोले भटूरे ग्राहकांना दिलेल जात आहेत. अस्वच्छ पाण्यात या प्लेट धुतल्या जात आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसचं संकट आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ शेअर करताना कोरोनाशी संबंधीत कॅप्शन याला देण्यात आलेत. ‘ जर तुम्ही उघड्यावरचं खाणं पसंत करत असाल तर कोरोना व्हायरसला घाबरू नका, भारतात कोरोना व्हायरसची ऐसी की तैसी’  असं कॅप्शन या खवय्यांसाठी देण्यात आलं आहे. आता पर्यंत हा व्हिडीओ 95 हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. तर 500 पेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

इतर बातम्या: कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे, अस असताना उघड्यावरचं खाणं खाऊ नका असा अनेक सुचना केल्या जात आहेत. मात्र त्या सगळ्या सुचनांकडे दुर्लक्ष करून खवय्ये रोडवर अस्वच्छतेत असलेल्या गाड्यांवर खाताना दिसता आहेत. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आरोग्या विभागाकडून सूचना करण्यात येत आहेत. स्वच्छता राखा, सारखे हात स्वच्छ ठेवा, आजारी व्यक्तींपासून लांब राहा, तुम्ही आजारी असल्यास बाहेर जाणं टाळा अशा सूचना करण्यात येत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी N-95 मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ****इतर बातम्या: Kiss करू नका, कोरोनाच्या भीतीने सरकारने दिलेत हे आदेश

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात