जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Kiss करू नका, कोरोनाच्या भीतीने सरकारने दिलेत हे आदेश

Kiss करू नका, कोरोनाच्या भीतीने सरकारने दिलेत हे आदेश

Kiss करू नका, कोरोनाच्या भीतीने सरकारने दिलेत हे आदेश

कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे. त्यामुळे प्रत्येक देशांतील सरकार नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पॅरिस, 04 मार्च : चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे. त्यामुळे प्रत्येक देशांतील सरकार नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहे. देशातील नागरिकांना कोरोना होऊ नये यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेण्यास सांगितलं आहे. दरम्यान, फ्रान्सच्या सरकारने नागरिकांनी किस करू नये अशा सूचना दिल्या आहेत. फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती देत नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. फ्रान्समध्ये दोन्ही गालावर किस करण्याची पद्धत आहे. त्याला Bise  असं म्हटलं जातं. कोरोनामुळे आता भेटताना ही प्रथा बंद करावी असं सांगत फ्रान्स सरकाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरस युरोपसह शेजारी देशांमध्ये वेगानं पसरत आहे. त्यामुळे फ्रान्स सरकारने 5 हजार पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यासही बंदी घातली आहे. कोरोनाचा धसका जगभरातील अनेक देशांनी घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची कोरोना व्हायरस तपासणी केली जात आहे. संबंधित बातमी : भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी फ्रान्स सरकार प्रयत्न करत आहे. सध्या व्हायरस पसरू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध कोरोनाचा धोका टळल्यानंतर उठवले जातील असंही फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. हे वाचा : कोरोना व्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती फ्रान्समधील पॅरिस इथं आयोजित करण्यात येणारी हाफ मॅरेथॉनही रद्द करण्यात आली आहे. जमावबंदी असल्यानं ही मॅरेथॉन रद्द केली. तसंच पॅरिसमधील जगप्रसिद्ध असलेलं Paris’ Louvre  हे म्युझियमसुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा : कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kiss
  • First Published :
जाहिरात
जाहिरात