अरे हे काय! मच्छीमाराला माशाच्या पोटात मिळाली Whisky ची बॉटल, VIDEO पाहून तुम्हीही हैराण व्हाल

एका मच्छीमाराला (Fisherman) माशाच्या पोटातून चक्क एक व्हिस्कीची (Whisky) बॉटल मिळाली आहे, तीही पूर्णपणे भरलेली.

एका मच्छीमाराला (Fisherman) माशाच्या पोटातून चक्क एक व्हिस्कीची (Whisky) बॉटल मिळाली आहे, तीही पूर्णपणे भरलेली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जून : मच्छीमारांना मासेमारी करताना अनेकदा अशा वस्तू सापडतात ज्याचा कधी विचारही केलेला नसतो. विविध गोष्टी आढळल्या असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता एका मच्छीमाराला अशीच एक भन्नाट गोष्ट आढळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मच्छीमाराला (Fisherman) माशाच्या पोटातून चक्क एक व्हिस्कीची (Whisky) बॉटल मिळाली आहे, तीही पूर्णपणे भरलेली. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे, ज्यात माशाच्या पोटात एक सीलबंद व्हिस्कीची बॉटल मिळते. मच्छीमारही अशाप्रकारे मिळालेल्या व्हिस्कीच्या बॉटलने आश्चर्चचकित झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय, की मच्छीमार मासा टेबलवर ठेवून कापण्यास सुरुवात करतो. सर्वात आधी तो माशाच्या वरचा भाग कट करतो, त्यानंतर ज्यावेळी पोटाच्या भागाकडे येतो तेव्हा माशाच्या पोटात व्हिस्कीची एक बंद बॉटल मिळते. अशाप्रकारे मिळालेली बॉटल पाहून तोदेखील हैराण होतो.

  (वाचा - भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि... पाहा VIDEO)

  (वाचा - घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन्न)

  Crush Videos नावाच्या यूट्यूब चॅनेलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारे दोन मच्छीमार कोणत्या समुद्रात आहेत, त्याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र सोशल मीडियावर या व्हिडीओची तुफान चर्चा आहे.
  Published by:Karishma
  First published: