जर तुम्ही तुमचं घर एखाद्याला भाडे तत्वावर देत असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. भाडेकरु तुमच्या घराची काय अवस्था करतील याचा अंदाजही लावता येणार नाही. असंच काहीसं झालंय, एका घर मालकीणीसोबत. घर मालकीण आपलं घरं भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली होती. मात्र परत आल्यानंतर तिने जे पाहिलं, त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. (फोटो सौ. Reuters)
45 वर्षीय तान्या लेवर्टीने एका कोरियन कुटुंबाला आपलं घर भाड्याने दिलं होतं. त्यानंतर ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत फॉरेन टूरसाठी निघाली. पण काही दिवसांनंतर तिला माहिती मिळाली की, तिच्या घराबाहेर मोठे पाईप दिसत आहेत. अशी माहिती मिळताच ती, आपल्या घरी आली आणि समोर जे पाहिलं त्याने ती थक्कच झाली. (फोटो सौ. शिफा खान/ news18)
घरातील दृष्य पाहून ती हैराण झाली. तिचे ज्या व्यक्तीला घर राहण्यासाठी भाड्याने दिलं होतं, त्या भाडेकरुने घराचं रुपांतर एका गांजाच्या शेतीमध्येच केलं होतं. घराच्या प्रत्येक खोलीत गांजाची रोपटी उगवली जात होती. त्यासाठीच घरात अनेक मोठे पाईप लावण्यात आले होते, जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
तान्याने घरी पोहचल्यावर पोलिसांना फोन करुन या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तपासानंतर सांगितलं की, घरात इतकी गांजाची शेती केली जात होती की, यातून जवळपास 8 कोटी रुपये वार्षिक कमाई होऊ शकत होती. ज्याला घर भाड्याने दिलं होतं, तो लगेचच पळून गेला. त्याने कित्येक महिने घर भाडंही दिलं नव्हतं. त्याशिवाय घराची अशी स्थिती केली की, कोणाला आता घर भाड्यानेही देता येणार नाही. हे घर, तान्याने कर्ज घेऊन खरेदी केलं होतं. त्यामुळे बँकेकडूनही घर तिला आता नोटिस पाठवण्यात येत आहे. घराचे हप्ते न फेडल्यास, घराचा लिलाव केला जाईल, असं बँकेतून सांगितलं जात आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)