मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : अरेच्चा! समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; विस्फोटामुळं हादरला किनारा

VIDEO : अरेच्चा! समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; विस्फोटामुळं हादरला किनारा

मेक्सिकोच्या (Mexico) युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला समुद्राच्या मध्यभागी आग (Fire on Ocean) लागली. घटनेची माहिती मिळताच आग विझविण्यात आली.

मेक्सिकोच्या (Mexico) युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला समुद्राच्या मध्यभागी आग (Fire on Ocean) लागली. घटनेची माहिती मिळताच आग विझविण्यात आली.

मेक्सिकोच्या (Mexico) युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला समुद्राच्या मध्यभागी आग (Fire on Ocean) लागली. घटनेची माहिती मिळताच आग विझविण्यात आली.

  • Published by:  Kiran Pharate

मेक्सिको 03 जुलै : मेक्सिकोच्या (Mexico) युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला समुद्राच्या मध्यभागी आग (Fire on Ocean) लागली. घटनेची माहिती मिळताच आग विझविण्यात आली. मेक्सिकोची सरकारी तेल कंपनी पेमेक्सानं म्हटलं, की समुद्रातील आग विझविण्यात आली आहे. कंपनीनं या आगीचं कारण पाण्यातील पाइपलाइनमधून झालेली गॅस गळती (Gas Leak in Ocean) असल्याचं सांगितलं आहे. आगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की समुद्राच्या मध्यभागी या आगीचा भडका झाला आहे. लोकांनी त्याला ‘आग की आंख’ असं नाव दिलं आहे. गोलाकारात ही आग पसरली असल्यानं तिला असं नाव दिलं गेलं आहे. पेमेक्स ऑइल प्लॅटफॉर्मपासून (Pemex oil platform) काही अंतरावर शुक्रवारी ही आग लागली. पेमेक्सनं म्हटलं, की आग विझविण्यासाठी पाच तासापेक्षा जास्त वेळ लागला.

व्यायामाची अशी पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल; कपलचा हा VIDEO पाहून व्हाल थक्क

चार सूत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की ही आग पेमेक्सच्या प्रमुख कु मालूब जाप ऑईल डेव्हलपमेंटच्या (Ku Maloob Zaap oil development) प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पाण्याखालील पाइपलाइनमधून सुरू झाली. कु मालुब जाप मेक्सिकोच्या (Gulf of Mexico) आखातीच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ आहे. पेमेक्सनं म्हटलं, की या घटनेत कोणीही जखमी झालं नाही तसंच गॅस गळतीमुळे प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनावरही परिणाम झाला नाही.

कंपनीनं सांगितलं, की ही आग शुक्रवारी सकाळी 5 वाजून 15 मिनिटांच्या आसपास लागली सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात आली. पेमेक्सनं सांगितलं, की कंपनी आग लागण्याच्या कारणांचा तपास करेल. पेमेक्सचं आपल्या फॅसिलिटीमध्ये इंडस्ट्रीयल दुर्घटनांसाठीचं मोठं आणि जुनं रेकॉर्ड आहे.

अरे ही नवरी आहे की...; लग्नाच्याच दिवशी नववधूचा अवतार पाहून नवरदेवही चक्रावला

मेक्सिकोच्या ऑईल सेफ्टी रेग्युलेटर ASEA चे प्रमुख एंजेल कॅरिजलेस यांनी ट्विट करत म्हटलं, की या घटनेत तेल गळती झालेली नाही. मात्र, या आगीचं कारण काय होतं, हे त्यांनी सांगितलेलं नाही. कू मालूब जाप पेमेक्सचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक आहे. कंपनीच्या दैनंदिन 17 लाख बॅरेल तेलाच्या उत्पादनातील 40 टक्के माल कू मालूबमधून येतो.

First published:

Tags: Fire, Video viral