कोलकाता 30 जुलै : विद्युत तारांचं एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) हुगली जिल्ह्यातील श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर (Fire Breaks Out at Shrirampur Railway Station) घडली आहे. गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास याठिकाणी आग लागली. ही घटना इतकी भयंकर होती की हळूहळू आग जंगलाकडे पसरली.
जिवाची पर्वा न करता तिघांना वाचवण्याासाठी घेतली पुराच्या पाण्यात उडी अन्....
तारांना लागलेल्या आगीनं जवळच असलेल्या जंगलाला आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं. यानंतर संपूर्ण परिसरात आगीचे लोट पसरल्याचं दिसून आलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी अग्निशमनाच्या दोन इंजिनांसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलं आहे.
पश्चिम बंगाल: रेल्वे स्टेशनवर लागली आग, आटोक्यात आणण्यात यश pic.twitter.com/TYIAFvl7BP
— News18Lokmat (@News18lokmat) July 30, 2021
VIDEO: मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार
आसपास असणाऱ्या नागरिकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओमध्ये आगीचं रौद्ररुप पाहायला मिळतं. 30 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्युत तारांमधील घर्षणामुळे लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं आता परिस्थिती आटोक्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Fire station, Shocking viral video