Home /News /viral /

डॉक्टरकडून रुग्णांची सर्वात मोठी फसवणूक उघड, निघाला 94 मुलांचा 'बाप'

डॉक्टरकडून रुग्णांची सर्वात मोठी फसवणूक उघड, निघाला 94 मुलांचा 'बाप'

त्याच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये तो आपले स्पर्म टाकत असे. हे सर्व तो रुग्णांना बेशुद्ध केल्यानंतर करत असे. हा डॉक्टर (doctor) महिला रुग्णांना न सांगता असं काम करायचा.

    नवी दिल्ली, 12 मे : अनेकवेळा असं घडतं, जेव्हा प्रसिद्ध डॉक्टरदेखील त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे चर्चेत येतात. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टरचं काळं कृत्य समोर आलं आहे. हा सगळा प्रकार तेव्हा घडला, जेव्हा या डॉक्टरवर डॉक्युमेंटरी तयार झाली. त्यानंतर डॉक्टरचं रहस्य समोर आलं आहे. हा डॉक्टर एक नाही, दोन नाही तब्बल 94 मुलांचा बाप निघाला. ही घटना एका अमेरिकन डॉक्टरशी संबंधित आहे. द मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड क्लाइन असं या डॉक्टरचं नाव आहे. त्याच्या रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये तो आपले स्पर्म टाकत असे. हे सर्व तो रुग्णांना बेशुद्ध केल्यानंतर करत असे. हा डॉक्टर महिला रुग्णांना न सांगता असं काम करायचा. हे वाचा - कासवाने केली मगरीच्या जबड्यातील घास हिसकावण्याची हिंमत; मग काय झालं पाहा, VIDEO आश्चर्याची बाब म्हणजे, डॉक्टरचं हे कृत्य त्याच्याच मुलीने उघड केलं आहे. जेकोबा बेलाद असे या डॉक्टरच्या मुलीचं नाव आहे. रिपोर्टनुसार, जेकोबाने स्वत: या डॉक्टरवर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये याबद्दल सांगितलं आहे. आणखी एका महिलेनेही डॉक्टरच्या कृतीबाबत खुलासा केला आहे. हे वाचा - बापरे! चक्क चित्त्यालाच किस करायला गेली तरुणी आणि...; Shocking आहे Video चा शेवट रिपोर्टनुसार, महिलेनं सांगितलं की, मला माहीतही नव्हते आणि हे सर्व डॉक्टर क्लाइन यांच्या उपचारादरम्यान घडलं. मात्र, उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी हे काम केल्याची घटना अनेक वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळच्या तरतुदीनुसार त्याने कोणताही फौजदारी कायदा मोडला नव्हता. त्याच्याकडून केवळ 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पण आता त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनल्याने तो परत एकदा चर्चेत आला.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: America, Viral news

    पुढील बातम्या