मुंबई, 12 मे : काही जणांचं प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की ते प्राणी म्हणजे त्यांचा जीवच असतो (Human animal love video). अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे ते प्राण्यांना जपतात. कुत्रा, मांजर यांचे असे बरेच व्हिडीओ (Animal love video) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात त्यांचे मालक त्यांच्यासोबत मस्ती करताना, त्यांना प्रेमाने गोंजारताना, अगदी त्यांची किस घेतानाही दिसतात. पण एका महिलेने थेट चित्त्यालाच (Woman kissing cheetah) किस देण्याचा प्रयत्न केला आहे (cheetah video). चित्ता म्हटलं तरी आपल्या अंगाला घाम फुटतो. अगदी नॅशनल पार्क, जंगल सफारी, प्राणीसंग्रहालयात गेल्यावर दुरून चित्ता पाहिला तरी आपला थरकाप उडतो. चित्ता अगदी जवळ आला तर मग आपला जीव गेल्यातच जमा. पण ही महिला मात्र अगदी जणू कुत्रा-मांजरच असावा असं चित्त्याजवळ बसली आहे. इतकंच नव्हे तर चित्त्याला तिने किसही केलं. पुढे या महिलेसोबत काय घडलं पाहा. हे वाचा - OMG! सडाखाली भांडं ठेवताच गाय आपोआप देते दूध; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO जिओसफारीज नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात ही महिला चित्त्यासोबत दिसते आहे. चित्त्याच्या शेजारी ती एकदम बिनधास्तपणे बसलेली दिसते. कॅमेऱ्याकडे पाहता पाहता ती अचानक चित्त्याच्या तोंडावर किस देते. तेव्हा आपले हार्टबीट्स वाढतात. पण या तरुणीच्या चेहऱ्यावर कोणतीच भीती दिसत नाही. ती हसताना दिसते.
यानंतर चित्त्याने जे केलं ते यापेक्षा शॉकिंग आहे. चित्ताही तिच्याकडे आपलं तोंड करतो आणि तिच्या गालाला आपल्या जिभेने चाटतो. एरवी कुत्रा-मांजर जसे माणसांवर प्रेम करताना त्यांना आपल्या जिभेने चाटतात तसाच हा चित्ताही प्रेम व्यक्त करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हे वाचा - VIDEO - चिमुकलीला माकडाने फरफटत नेलं आणि…; अंगावर काटा आणणारं भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद दरम्यान तरुणीचा हा व्हिडीओ याआधीही व्हायरल झाला होता. ज्यात ती बऱ्याच चित्त्यांसोबत दिसली होती. नेचर नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यात तीन व्हिडीओ होते.
पहिल्या व्हिडीओत तिला चित्त्याला घट्ट धरल्याचं दिसतं आहे. ही महिला त्याच्या पाठीवरून हात फिरवते आहे आणि चित्ता शांत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ही महिला चित्त्याच्या मानेवरून हात फिरवते आहे. जणू ती त्याला मसाज देते आहे आणि चित्ता डोळे बंद करून शांत बसून मसाजचा आनंद लुटतो आहे आणि शेवटच्या व्हिडीओत ती चित्त्याला किस करताना दिसते.