Home /News /viral /

इवल्याशा कासवाने केली मगरीच्या जबड्यातील घास हिसकावण्याची हिंमत; पुढे काय झालं पाहा, VIDEO

इवल्याशा कासवाने केली मगरीच्या जबड्यातील घास हिसकावण्याची हिंमत; पुढे काय झालं पाहा, VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की इवल्याशा कासवाने मगरीच्या तोंडातून घास हिसकावून घेतला. इतक्या भयानक प्राण्याच्या तोंडासमोरील घास हिसकावून घेण्याची हिंमत मोठमोठे प्राणीही करणार नाहीत

  नवी दिल्ली 12 मे : मगर ही जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. मगर पाण्यात असो किंवा जमिनीवर, तिच्यासमोर एखादा प्राणी आला आणि मगरीच्या जबड्यात सापडला तर त्याचं जिवंत माघारी येणं जवळपास अशक्य असतं. मगर फक्त वन्य प्राणीच नाही तर अनेकदा माणसांवरही हल्ला करुन जीवही घेते. मगर जर पाण्यात असेल तर तिच्यापुढे जाण्याचं सिंह, वाघ यांसारखे भयानक प्राणीही धाडस करत नाहीत. असं म्हटलं जातं की जमिनीपेक्षा ती पाण्यात जास्त शक्तीशाली होते. त्यामुळे पाण्यात जाऊन मगरीचा सामना करण्यापासून सगळेच लांब राहतात. मगरीने मोठमोठ्या प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडिओ (Crocodile Attack Video) तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत मगर एखाद्या प्राण्याला आपली शिकार बनवते. मात्र, आता मगरीचा अतिशय वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. यात या प्राण्याने इवल्याशा कासवासमोर माघार घेतल्याचं पाहायला मिळतं. OMG! सडाखाली भांडं ठेवताच गाय आपोआप देते दूध; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की इवल्याशा कासवाने मगरीच्या तोंडातून घास हिसकावून घेतला. इतक्या भयानक प्राण्याच्या तोंडासमोरील घास हिसकावून घेण्याची हिंमत मोठमोठे प्राणीही करणार नाहीत. मात्र कासव हिंमत दाखवून मगरीच्या तोंडापुढील घास हिसकावून घेऊन गेलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगर आरामात पाण्यात बसलेली आहे आणि तिच्या आजूबाजूला काही कासवंही आहेत. इतक्यात तिथे एक व्यक्ती येतो आणि खाण्याचा काहीतरी पदार्थ मगरीसमोर फेकतो.
  हे खाण्यासाठी मगर पुढे सरकते मात्र तिच्याआधीच एक लहानसं कासव तिथे पोहोचतं आणि मगरीसमोरून तिचा घास हिसकावून निघून जातं. हे पाहून मगर ते आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करते, मात्र बिचारी यात अपयशी ठरते. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर marinelife.earth नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. धावत्या दुचाकीवर रस्त्यातच दोघांनी केली जागांची अदलाबदल; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं 'समुद्री कासवाचा विजय झाला'. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 मिलियन म्हणजेच 10 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 11 हजारहून अधिकवेळा लाईक केला गेला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं 'आधी कासवाने सशाला हरवलं आणि आता मगरीचा घास हिसकावून घेतला.' इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crocodile, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या