मराठी बातम्या /बातम्या /Viral /

''मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ.'' नोटींवर असं का लिहिलं असतं?

''मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ.'' नोटींवर असं का लिहिलं असतं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पैसे हे आपल्याला आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून येतात. एक रुपयाची नोट वगळता सर्व नोटांवर आरबीआय गव्हर्नरची सही आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 30 नोव्हेंबर : पैसे हे व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पैशांसाठीच लोक काम करतात. खरंतर पोट भरणं आणि आपल्या गरजेच्या वस्तु खरेदी करणं हे यामागचं प्राथिमक विचार असतात. त्यानंतर लोक याचा वापर आपल्या चैनीच्या वस्तु विकत घेण्यासाठी करतात. कारण काहीही असली तरी लोकांसाठी पैसा महत्वाचाच.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पैसे हे आपल्याला आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून येतात. एक रुपयाची नोट वगळता सर्व नोटांवर आरबीआय गव्हर्नरची सही आहे. तसेच त्यावर अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात प्रत्येक नोटीवर त्याच्या मुल्या प्रमाणे पैसे लिहून मी ते देण्याचे वचन देतो असे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल.

हे ही पाहा : कारच्या साइड मिररसंदर्भात तुम्ही तर करत नाही ना ही चूक? ती आत्ताच बदला

उदाहरणार्थ "मी धारकाला 100 किंवा 500 रुपये देण्याचे वचन देतो" असं लिहिलं जातं. खरंतर ही आरबीआयच्या गव्हर्नरची शपथ आहे की, ज्याच्याकडे ही नोट आहे, त्याला या नोटीवर लिहिलेली किंमत देण्याची जबाबदारी आरबीआयच्या गव्हर्नरची आहे.

चला भारतीय चलनाच्या इतिहासावर थोडी नजर टाकू

भारताकडे स्वत:चे चलन छापण्याची जबाबदारी १९३५ पूर्वी दिली गेली. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. ज्यानंतर या बँकेकडे नोटा जारी करण्याचे अधिकार दिले गेले.

भारतात नोटांची छपाई ही किमान राखीव प्रणालीच्या आधारे केली जाते. ही प्रणाली भारतात १९५७ पासून लागू आहे. यानुसार किमान 200 कोटी रुपयांची मालमत्ता आरबीआय फंडात कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेला अधिकार आहे.

या 200 कोटींपैकी 115 कोटींचं सोनं आणि उर्वरित 85 कोटीची विदेशी मालमत्ता ठेवणं गरजेचं आहे. इतकी मालमत्ता ठेवल्यानंतर आरबीआय देशाच्या गरजेनुसार कितीही मोठ्या प्रमाणात नोटा छापू शकते, तरीही त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते.

प्रतिकात्मक फोटो

"मी धारकाला १०/२०/१००/५०० रुपये देण्याचे वचन देतो याचा अर्थ काय आहे?

कोणत्याही नोटेवर रिझर्व्ह बँक हे स्टेटमेंट छापते, कारण ती छापलेल्या रकमेचं सोनं राखून ठेवते. म्हणजेच जर तुमच्याकडे शंभर रुपयांची नोट असेल तर त्याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडे शंभर रुपयांचा सोन्याचा साठा आहे, हे धारकाला पटवून देण्यासाठी ती हे विधान लिहिते.

त्याचप्रमाणे इतर नोटांच्याबाबतीत देखील आहे. तुमच्याकडे असलेल्या नोटेचे तुम्ही धारक आहात आणि तुमचे सोने त्याच्या किमतीएवढे रिझर्व्ह बँकेकडे ठेवले जाते आणि त्या नोटेच्या बदल्यात ते सोने तुम्हाला देण्यास रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे. म्हणून हे सगळं बँकेवर लिहिलं जातं.

First published:

Tags: History, Money, Rbi, Reserve bank of india