जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिलेनं स्वतःच्या फोटोवरच केली विचित्र कमेंट; Facebook ने केलं ब्लॉक, प्रकरण वाचून खळखळून हसाल

महिलेनं स्वतःच्या फोटोवरच केली विचित्र कमेंट; Facebook ने केलं ब्लॉक, प्रकरण वाचून खळखळून हसाल

महिलेनं स्वतःच्या फोटोवरच केली विचित्र कमेंट; Facebook ने केलं ब्लॉक, प्रकरण वाचून खळखळून हसाल

सोशल मीडियावर एका महिलेनं स्वतःच आपल्याला फेसबुकने बॅन केल्याचं सांगितलं. महिलेला ज्या कारणामुळे बॅन केलं गेलं, ते वाचून तुम्हालाही हसू येईल

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 30 जानेवारी : आजकाल सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास प्रत्येकजण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. मात्र हेदेखील खरं आहे की सोशल मीडियामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. याच कारणामुळे आता सोशल लाईफ सुरळीत करण्यासाठी या प्लॅटफॉर्मनेही आपल्या वापराचे अनेक नियम बनवले आहेत. जेणेकरून याच्यामुळे काही समस्या निर्माण होऊ नये किंवा गैरवापर होऊ नये. विशेषतः फेसबुकने आपल्या वापरासाठी अनेक कडक नियम (Rules of Facebook) बनवले आहेत, ज्यामुळे लोकांना याचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. यातील एकही नियम तोडला तर फेसबुक तुम्हाला बॅन (Ban on Facebook) करू शकतं. छतावरुन उतरण्यासाठी पायऱ्यांचा घेतला आधार पण..; बाळाचा VIDEO पाहून व्हाल थक्क सोशल मीडियावर एका महिलेनं स्वतःच आपल्याला फेसबुकने बॅन केल्याचं सांगितलं. महिलेला ज्या कारणामुळे बॅन केलं गेलं, ते वाचून तुम्हालाही हसू येईल. क्लेअर शार्प नावाच्या या महिलेनं सांगितलं की तिने आपल्या फोटोवर अशी कमेंट केली की फेसबुकने तिला महिनाभरासाठी बॅन केलं. ट्विटरवर तिने ही घटना शेअर केली. क्लेअरने सांगितलं, की तिने स्वतःची ऑनलाईन बटाट्यासोबत तुलना केल्याने फेसबुकने तिला बॅन केलं.

News18

क्लेअरने या प्रकरणाबाबत सविस्तर बोलताना सांगितलं, की तिने आपला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोच्या कमेंटमध्ये तिने आपण बटाट्याप्रमाणे दिसत असल्याचं म्हटलं होतं. या कमेंटच्या आधारे फेसबुकने असा अंदाज लावला की ती कोणाची तरी मस्करी करत आहे. कोणाचीतरी चेष्टा केल्याने फेसबुकने तिला बॅन केलं. या बॅनमुळे तिने फेसबुकला याचं कारण विचारलं. यावर फेसबुकने जे उत्तर दिलं त्याचं स्क्रीनशॉट क्लेअरने शेअर केला.

महिलेनं बाळाला दिलं अतिशय विचित्र नाव; ऐकताच पोट धरून हसू लागले लोक

क्लेअरने फेसबुक टीमला सांगितलं की तिने स्वतःच्या फोटोवरच ही कमेंट केली होती. तिच्या ड्रेसमुळे ती बटाट्याप्रमाणे दिसत होती. ती कोणाच्या फिजिकल अपियरंसवर कमेंट करत नव्हती. मात्र, तरीही फेसबुकने तिचं अकाऊंट अनब्लॉक केलं नाही. म्हणजेच आता पुढचे 30 दिवस ती फेसबुकचा वापर करू शकणार नाही. आता फेसबुक तुमच्या सगळ्या अकाऊंट डिटेल्सवर नजर ठेवतं. तुमच्या पोस्टपासून किंवा कमेंटमधून एखाद्याचे मस्करी केली जात असेल तर फेसबुक हे अकाऊंट ब्लॉक करतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात