Home /News /viral /

महिलेनं बाळाला दिलं अतिशय विचित्र नाव; ऐकताच पोट धरून हसू लागले लोक

महिलेनं बाळाला दिलं अतिशय विचित्र नाव; ऐकताच पोट धरून हसू लागले लोक

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

बाळाचं नाव अतिशय विचार करून, सावधानतेनं, हौसेनं आणि प्रेमाने ठेवलं जातं. मात्र एका आईनं आपल्या बाळाचं इतकं विचित्र नाव (Weird Name of Baby) ठेवलं की यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली.

    नवी दिल्ली 29 जानेवारी: घरात नवीन बाळ जन्माला येणार असलं की सर्वात आधी त्याच्या नावाबद्दल चर्चा सुरू होते. असं म्हटलं जातं की नावाचा परिणाम मुलाच्या व्यक्तिमत्वावरही होतो. याच कारणामुळे पालक आपल्या मुलाचं नाव ठेवण्याआधी भरपूर रिसर्च करतात आणि त्याचा अर्थही तपासतात. म्हणजेच एकंदरीत बाळाचं नाव अतिशय विचार करून, सावधानतेनं, हौसेनं आणि प्रेमाने ठेवलं जातं. मात्र एका आईनं आपल्या बाळाचं इतकं विचित्र नाव (Weird Name of Baby) ठेवलं की यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली. 8 बायकांसोबत एकाच घरात राहातो व्यक्ती; अतिशय अजब आहेत आठही Love Story सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit च्या माध्यमातून एका निनावी व्यक्तीने आपल्या महिला सहकाऱ्याविरोधात राग व्यक्त केला. हा राग महिलेच्या बाळाच्या नावामुळे आहे. यूजरने तक्रार केली की महिलेनं कोणासोबतही चर्चा न करता आपल्या बाळाचं असं नाव ठेवलं आहे, ज्यामुळे संपूर्ण आयुष्य तिला शरमल्यासारखं वाटेल. बाळाचं नाव ऐकून कोणालाही चांगलं वाटणार नाही. त्याचं नाव घेण्याआधी लोक नाव ठेवणाऱ्या व्यक्तीवर हसू लागतील. या महिलेनं आपल्य आवडीचं नाव आपल्या मुलीला दिला मात्र हे नाव ऐकून सगळेच अवाक झाले आहेत. महिलेसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने सांगितलं की तिने एकदा आपल्या जवळच्या लोकांसोबत तरी नावाबद्दल चर्चा करायला हवी होती. असं केल्यास कोणीही तिला हे नाव ठेवू दिलं नसतं. महिलेच्या मुलीचं नाव एखाद्या शाम्पूच्या बाटलीप्रमाणे वाटतं. या मुलीचं नाव स्ट्रॉबेरी रेन असं ठेवण्यात आलं आहे. यावर रेडिटवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीने बॉयफ्रेंडला पाठवला असा फोटो की बघूनच शॉक झाला तरुण; लगेचच केला ब्रेकअप याआधीही इंग्लंडच्या प्लेमाउथ येथे राहणारी एक महिला आपल्या मुलाच्या नावामुळे चर्चेत आली होती. तिने एका वाईन शोमध्ये आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली होती. यानंतरच अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. तिने आपल्या मुलाचं नाव ‘लूसिफर’ (Lucifer) असं ठेवलं होतं. या नावाचा अर्थ होतो सैतान. एक आई आपल्या मुलाला असं नाव कसं देऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आपल्याला आपल्या मुलाला एक युनिक नाव द्यायचं होतं असं मुलाच्या आईनं सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Small baby, Viral news

    पुढील बातम्या