Home /News /viral /

छतावरुन उतरण्यासाठी लाकडी पायऱ्यांचा घेतला आधार पण...; चिमुकल्याचा हा VIDEO पाहून व्हाल थक्क

छतावरुन उतरण्यासाठी लाकडी पायऱ्यांचा घेतला आधार पण...; चिमुकल्याचा हा VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडिओमध्ये दिसतं, की एक लहान मुलगा लाकडी पायऱ्यांच्या मदतीने घराच्या छतावरुन खाली उतरत आहे. तर खाली उभा असलेले लोक त्याचा व्हिडिओ बनवत आहेत

  नवी दिल्ली 29 जानेवारी : आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ (Viral Video of Small Boy) समोर आला आहे. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. व्हिडिओ (Shocking Video) हैराण करणारा असून तुम्हाला हे दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. 8 बायकांसोबत एकाच घरात राहातो व्यक्ती; अतिशय अजब आहेत आठही Love Story व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा असं काम करताना दिसतो, जे तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक लहान मुलगा लाकडी पायऱ्यांच्या मदतीने घराच्या छतावरुन खाली उतरत आहे. तर खाली उभा असलेले लोक त्याचा व्हिडिओ बनवत आहेत. यात हैराण करणारी बाब म्हणजे हा मुलगा अतिशय लहान आहे आणि तो घसरत घसरत या पायऱ्यांवरुन खाली येत आहे.
  व्हिडिओ पाहून असं वाटतं की हा मुलगा लाकडी पायऱ्यांवर पायही न ठेवता घसरतच खाली जमिनीवर आला आहे. यानंतर तो जमिनीवर चालू लागतो. यादरम्यान त्याच्याजवळ एक महिला येते आणि त्याला पकडून तिथून घेऊन जाते. व्हिडिओ पाहून असं वाटतं जणू हा मुलगा स्टंट करत आहे. हैराण करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तरुणीने बॉयफ्रेंडला पाठवला असा फोटो की बघूनच शॉक झाला तरुण; लगेचच केला ब्रेकअप
  अनेकांनी हा व्हिडिओ पाहून चिंता व्यक्ती केली आहे. काही यूजर्सनी या मुलाच्या घरचे अतिशय बेजबाबदार असल्याचं म्हणत सवाल उपस्थित केले आहेत. सोशल मीडिया यूजर्सचं असं म्हणणं आहे की लहान मुलाचा जीव धोक्यात टाकून त्याला खाली येण्यासाठी एकट्याला सोडलं आहे. तर काहींनी मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी हा मुलगा स्पायडरमॅन असल्याचं म्हणत मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Small baby, Stunt video

  पुढील बातम्या