मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रवासात बदली झालेलं सामान परत मिळवण्यासाठी भलताच जुगाड; पठ्ठ्याने IndiGo ची वेबसाईटच केली हॅक अन्...

प्रवासात बदली झालेलं सामान परत मिळवण्यासाठी भलताच जुगाड; पठ्ठ्याने IndiGo ची वेबसाईटच केली हॅक अन्...

एअरलाईन्सकडे मदत मागूनही लगेज परत न मिळाल्यानं नंदन कुमार यांनी स्वत:च एअरलाईन्सची वेबसाइट हॅक (Airline Website hacking) करून आपलं लगेज परत मिळवलं आहे.

एअरलाईन्सकडे मदत मागूनही लगेज परत न मिळाल्यानं नंदन कुमार यांनी स्वत:च एअरलाईन्सची वेबसाइट हॅक (Airline Website hacking) करून आपलं लगेज परत मिळवलं आहे.

एअरलाईन्सकडे मदत मागूनही लगेज परत न मिळाल्यानं नंदन कुमार यांनी स्वत:च एअरलाईन्सची वेबसाइट हॅक (Airline Website hacking) करून आपलं लगेज परत मिळवलं आहे.

नवी दिल्ली 31 मार्च : एअर ट्रॅव्हलच्या माध्यमातून अतिशय कमी वेळात आपल्याला इच्छित ठिकाणी पोहचता येतं. त्यामुळे सध्या देशांतर्गत प्रवासासाठीदेखील (Air Travel) अनेकजण फ्लाईटचा वापर करतात. फ्लाईटनं प्रवास करताना विमानतळावर प्रवाशांकडून लगेज (Luggage) घेतलं जातं आणि ते स्वतंत्रपणे गंतव्यस्थानी पाठवलं जातं. या प्रक्रियेत प्रवाशांचं सामान हरवण्याच्या किंवा बदली होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना कस्टमर केअर सेंटरशी (Customer Care Center) संपर्क करावा लागतो. परंतु, बहुतेक घटनांमध्ये विमान कंपन्यांची कस्टमर केअर सेंटर प्रवाशांच्या समस्या सोडवण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.

असाच काहीसा प्रकार नंदन कुमार (Nandan Kumar) नावाच्या प्रवाशासोबत घडला होता. इंडिगो एअरलाईन्सच्या (IndiGo) फ्लाईटनं प्रवास करताना त्याचं लगेज एका दुसऱ्या प्रवाशाच्या लगेजसोबत एक्सचेंज (Luggage Exchange) झालं होतं. एअरलाईन्सकडे मदत मागूनही लगेज परत न मिळाल्यानं नंदन कुमार यांनी स्वत:च एअरलाईन्सची वेबसाइट हॅक (Airline Website hacking) करून आपलं लगेज परत मिळवलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रशियाची कुख्यात स्नायपर युक्रेनच्या ताब्यात; ननपासून शूटर बनलेल्या महिलेनं केलीये 40 हून अधिकांची हत्या

एक सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) असलेल्या नंदन कुमार यांनी काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या फ्लाइटनं (IndiGo Flight) पाटणा ते बंगळुरू (Patna to Bangalore) असा प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान कुमार यांचं लगेज नजरचुकीनं एका सहप्रवाशाकडे गेलं. आपलं लगेज परत मिळवण्यासाठी कुमार यांनी स्वत:च्या डेव्हलपर स्किल्सचा वापर केला. त्यांनी इंडिगो एअरलाईन्सची वेबसाईट हॅक करून सहप्रवाशाची माहिती मिळवली आणि त्याच्याशी संपर्क करून आपलं लगेज परत मिळवलं. त्याचबरोबर नंदन कुमार यांनी इंडिगो वेबसाईटच्या (IndiGo website) सिक्युरिटीतील त्रुटी (Security Flaws) देखील कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवर शेअर केली आहे.

नंदन कुमार यांनी इंडिगोच्या 6E-185 या फ्लाईटनं प्रवास केला होता. घरी गेल्यानंतर त्यांना आपलं लगेज एक्सचेंज झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी एअरलाईनच्या कस्टमर केअर सर्व्हिस क्रमांकावर कॉल केला. तिथे तक्रार दाखल करून त्यांनी हरवलेलं सामान शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रोटोकॉलचं (Protocol) पालन केलं. त्यांना कंपनीकडून सहकार्य मिळालं नाही. एअरलाईनच्या कस्टमर केअर टीमनं नंदन कुमार यांना सामान बदली झालेल्या सहप्रवाशाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देण्यास असमर्थतता दर्शवली. प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीचा (Data Security) हवाला देऊन कंपनीनं कुमार यांना सहकार्य केलं नाही, अशी माहिती ट्विट करून नंदन कुमार यांनी दिली आहे.

भारतात फक्त एका कलिंगडासाठी झालेलं भयंकर युद्ध माहितीये का? हजारो सैनिकांनी गमावलेले प्राण

'एअरलाईन्सकडून सहकार्य न मिळाल्यानं मी स्वत: च्या कौशल्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. एखादी वेबसाईट ओपन केल्यानंतर जर तुम्ही F12 की प्रेस केली तर डेव्हलपर्स टूल्स डिस्प्ले होतात. या टूल्समुळे इंजिनिअर्स वेबसाइट सर्व्हरवर आलेल्या सर्व विनंत्या आणि प्रतिसाद पाहता येतात. मी इंडिगो वेबसाईटचं डेव्हलपर कन्सोल (Developer Console) उघडून नेटवर्क लॉग रेकॉर्ड तपासलं. काही वेळातच मला बॅग बदली झालेल्या प्रवाशाची माहिती मिळाली', असं कुमार यांनी ट्विट केलं आहे.

नंदन कुमार यांच्या या ट्विट थ्रेडला पाच हजारांहून अधिक लाईक्स आणि रिअॅक्शन्स मिळाल्या आहेत. अनेक लोकांनी कुमार यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. काहींनी आपले स्वत:च्या विमानप्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत.

कुमार यांनी आपल्या या प्रयत्नांना 'हॅकिंग मूव्हमेंट' म्हटलं आहे. वेबसाईट हॅक करून त्यांनी सहप्रवाशाचा यशस्वीपणे शोध घेतला आणि आपलं लगेज परत मिळवलं. यासोबतच त्यांनी इंडिगोला त्यांच्या वेबसाईटमधील सिक्युरीटी इश्युही लक्षात आणून दिले आहेत. नंदन कुमार यांच्या ट्विट्सला इंडिगोनं एक खास नोट शेअर करून प्रतिसाद दिला आहे. ज्यात इंडिगोनं झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि वेबसाईट सिक्युरिटीमध्ये त्रुटी नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

नंदन कुमार यांच्या या कारनाम्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. एअरलाईन्स कंपन्यांनी प्रवाशांना कमी लेखण्याची चूक करू नये, असंच जणू कुमार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

First published:

Tags: Hacking, Travel by flight, Viral news