नवी दिल्ली 31 मार्च : युद्ध कधीही कोणाचं भलं करत नाही. युद्धात अनेक लोक आपला जीव गमावतात तर अनेकजण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला गमावतात. आतापर्यंत झालेल्या सर्व युद्धांचं कारण सत्ता आणि संपत्ती हेच आहे. पण इतिहासात असंही एक युद्ध लढलं गेले, जे ना सत्तेसाठी होतं ना पैशासाठी. या युद्धाचं कारण फक्त एक कलिंगड होतं (War for 1 Watermelon). होय, इतिहासात हे युद्ध मतीरे की राड़ (Mateere ki Rad) म्हणून ओळखलं जातं. चक्क लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवाच्या मित्राने केलं नवरीला प्रपोज पण…; पुढे आला भलताच ट्विस्ट मतिरा म्हणजे कलिंगड. भारतातील प्रत्येक प्रदेशात एकच फळ वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. राजस्थानमध्ये मतिरा म्हणजे कलिंगड. तर राड म्हणजे लढाई. म्हणजेच कलिंगडासाठी झालेली लढाई. त्यावेळी कलिंगडावरुन दोन संस्थानांमध्ये भीषण युद्ध झालं, ज्यामध्ये हजारो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. हे युद्ध बिकानेर संस्थानातील सिल्वा गाव आणि नागौर येथील जखानियन गाव यांच्यात झालं. बिकानेर संस्थानात एक कलिंगडाचा वेल होता, असं सांगितलं जातं. या वेलीतील एक फळ नागौर संस्थानाच्या जमिनीवर गेलं. हेच कलिंगड शेवटी युद्धाचं कारण ठरलं. बिकानेरचे संस्थानिक म्हणायचे की हे फळ त्यांचं आहे कारण या वेलाची मुळे त्यांच्या राज्यात आहेत. तर नागौरचं म्हणणं होतं की, फळ आमच्या हद्दीत वाढलं आहे, म्हणजे आमचं आहे. याच मुद्द्यावरून युद्ध सुरू झालं. मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने सुरू केलं भलतंच काम; हजारो नाणी घेऊन स्कूटी खरेदीसाठी पोहोचला तरुण हे युद्ध दोन संस्थानांच्या नावावर झालं पण सर्वात रंजक गोष्ट म्हणजे दोन्ही संस्थानांच्या राजांना युद्धाची माहिती नव्हती. गावकऱ्यांनी आपापसात युद्ध केलं होतं. मात्र, राजांना याबाबत माहिती मिळेपर्यंत हे युद्ध बिकानेरनं जिंकलं होतं. मात्र या युद्धात हजारो सैनिकांना प्राण गमवावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.