Home /News /videsh /

रशियाची कुख्यात स्नायपर युक्रेनच्या ताब्यात; ननपासून शूटर बनलेल्या महिलेनं केलीये 40 हून अधिकांची हत्या

रशियाची कुख्यात स्नायपर युक्रेनच्या ताब्यात; ननपासून शूटर बनलेल्या महिलेनं केलीये 40 हून अधिकांची हत्या

फोटो क्रेडिट - संडे वर्ल्ड

फोटो क्रेडिट - संडे वर्ल्ड

युक्रेनियन सैन्याच्या हाती डॉनबास येथील एक अशी महिला लागली आहे, जिचा ते बऱ्याच काळापासून शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला रशियन सैन्याची सर्वात भयानक स्नायपर आहे

    कीव 31 मार्च : युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाचा (Russia Ukraine War) आज ३६ वा दिवस आहे. युक्रेनमधील शहरांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्याचा रशिया सातत्याने प्रयत्न करत आहे. जगभरातील देश रशियाचा निषेध करत असताना कीव, खार्किव, ल्विव, मारियुपोल, ओडेसेसह इतर अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस सुरू आहे. दुसरीकडे युक्रेनही रशियासमोर हार मानायला तयार नाही. त्यामुळे रशियाच्या हल्ल्यांना युक्रेनही प्रत्युत्तर देत आहे. Russia-Ukraine युद्धाचा भारतातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या कसा यादरम्यान, युक्रेनियन सैन्याच्या हाती डॉनबास येथील एक अशी महिला लागली आहे (Female Russian Sniper Captured in Ukraine), जिचा ते बऱ्याच काळापासून शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला रशियन सैन्याची सर्वात भयानक स्नायपर असून तिचं नाव इरिना स्टारिकोवा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरिनाने आतापर्यंत 40 हून अधिक युक्रेनियन नागरिकांची हत्या केली आहे. यामध्ये युक्रेनियन महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. इरिनाला पकडणं हे युक्रेनियन सैन्यासाठी मोठं यश मानलं जात आहे.एबीपी हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इरिना स्टारिकोवा 2014 पासून युक्रेनविरुद्ध लढत आहे. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी इरिना फुटीरतावाद्यांसह युक्रेनियन सैन्याला लक्ष्य करत असे, यामुळं तिला ताब्यात घेणं गरजेचं होतं. सुरुवातीला युक्रेनचे सैनिक या महिलेला ओळखू शकले नाहीत, परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची खरी ओळख समोर आली. Russia-Ukraine War: 'युद्धाचा परिणाम काहीही असो पण आम्ही....'; आण्विक हल्ल्याबाबत रशियाने केलं मोठं विधान युक्रेनच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरिना मूळची सर्बियाची असून सैन्यात येण्यापूर्वी ती नन होती. इरीनाला दोन मुली आहेत, तर तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, War

    पुढील बातम्या