Home /News /viral /

उडत्या विमानात प्रवाशांची जबर हाणामारी; इतकं धक्क्दायक कृत्य केलं, की करावं लागलं Emergency Landing

उडत्या विमानात प्रवाशांची जबर हाणामारी; इतकं धक्क्दायक कृत्य केलं, की करावं लागलं Emergency Landing

या दोन्ही भावांनी फ्लाइटमध्येच एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या फ्लाइटमध्ये बसलेल्या इतर 200 प्रवाशांना चांगलाच त्रास झाला.

    नवी दिल्ली 06 जून : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बातमीनुसार, दोन भावांनी उडत्या विमानात भरपूर गोंधळ घातला. दोन्ही भाऊ पूर्णपणे नशेत होते. फ्लाइटच्या आत दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारलं (Fighting in Flight). हद्द तेव्हा झाली जेव्हा फ्लाइटमध्येच एका भावाने दुसऱ्यावर लघवी केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही भाऊ दक्षिण पूर्व लंडनचे रहिवासी आहेत. डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात मारहाण, ट्रॅफिक कॉन्स्टेबलची दादगिरी कॅमेऱ्यात कैद 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण गेल्या महिन्यात 12 मे रोजी घडलं आहे. यात जेट-2 विमान लंडनमधील स्टॅनस्टेड विमानतळावरून ग्रीसमधील क्रेट देशासाठी रवाना झालं होतं. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं की, एअरलाइन्सने दोन्ही भावांवर 50 हजार युरो म्हणजेच सुमारे 41 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय या दोन्ही भावांना जेट-2 फ्लाइटमधून प्रवास करण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. फ्लाइटमधील एका प्रवाशाने या दोन्ही भावांमधील भांडणाचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. मात्र, रेकॉर्डिंग करणाऱ्या प्रवाशाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये ग्रीक पोलीस अधिकारी एका भावाला फ्लाइटमधून खाली उतरवताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट स्टाफला दोन्ही भावांच्या सीटच्या खाली व्होडकाच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. VIDEO : घोड्यावर बसताना स्टाईल मारणं भोवलं; प्राण्यानं जोरात लाथ मारताच हवेत उडाला व्यक्ती या दोन्ही भावांनी फ्लाइटमध्येच एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या फ्लाइटमध्ये बसलेल्या इतर 200 प्रवाशांना चांगलाच त्रास झाला. त्यांच्या भांडणामुळे आणि कृत्याने कंटाळलेल्या जेट-२ एअरलाइन्सच्या पायलटला विमान ग्रीसमधील क्रेटऐवजी कॉर्फू शहरात उतरवावं लागलं, जेणेकरून या दोन भावांना विमानातून बाहेर काढता येईल. विमानातील या घटनेमुळे विमानाला पोहोचायला सुमारे साडेचार तास उशीर झाला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Travel by flight

    पुढील बातम्या