नवी दिल्ली 05 जून : काही लोक खूप विचित्र असतात, ज्यांना पाहून तुम्ही म्हणू शकता की जगात मूर्खांची कमी नाही. कारण कधीकधी हे लोक त्यांच्या विचित्र कृत्यांमुळे अडचणीत सापडतात. अशा लोकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Horse Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की कर्माचं फळ नेहमीच मिळतं. कारचा दरवाजा न उघडताच आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली तरुणी; थक्क करणारा VIDEO जगात काही लोक प्राणी-पक्षी प्रेमी असतात, तर काही प्राण्यांना विनाकारण त्रास देताना दिसतात. मात्र कधी कधी माणसाच्या अशाच विचित्र कृती त्यांना अडचणीत आणतात. आता समोर आलेला हा व्हिडीओही असाच आहे. यात हा व्यक्ती उडी मारून घोड्यावर चढण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र घोड्याने त्याला असा धडा शिकवला की आता तो आयुष्यात कधीही घोड्यावर बसण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल.
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये तुम्हाला एक घोडा दिसेल. ज्यावर एक व्यक्ती उडी मारून बसण्याचा प्रयत्न करत आहे, पण घोडा दुसऱ्याच विचारात असतो आणि घोडा आपले मागचे दोन पाय वेगाने झटकतो. जे थेट व्यक्तीच्या छातीपर्यंत जातात. त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने घोड्याने लाथ मारली, त्यानुसार त्याला किती लागलं असेल याची कल्पना येते. @solo_Accident_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. याशिवाय लोक त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. स्विमिंग पुलमध्ये उडी घेताच बेशुद्ध झाला चिमुकला; पुढे घडलं अनपेक्षित, Shocking Video ही क्लिप पाहिल्यानंतर एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं की, घोड्यावर बसण्यापूर्वी त्याची देहबोली समजून घेणं गरजेचं आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिलं ‘इथून पुढे घोड्यावर बसण्यापूर्वी हा व्यक्ती 100 वेळा विचार करेल’. याशिवाय इतरही अनेक यूजर्स आहेत ज्यांनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

)







