तमिळनाडू, 05 जून: तमिळनाडूतील (Tamil Nadu) कोईम्बतूर (Coimbatore) येथे ड्युटीवर असताना एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलनं (Traffic Constable) फूड डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) कानाखाली मारताना दिसत आहे. आता प्रशासनाने या हवालदारावर कारवाई करत त्याची शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये बदली सिंगनल्लूर पोलीस ठाण्यातील ग्रेड-1 कॉन्स्टेबल सतीशने शुक्रवारी अविनाशी रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये बदली केली.
"This happened yesterday evening at the fun mall signal and there was a slight traffic block due to this delivery boy and all of a sudden this Cop Started beating up the Delivery person "
— We Love Covai ❤️ (@welovecovai) June 4, 2022
. #welovecovai
.
👉 IG : FB :TW @WELOVECOVAI
.#coimbatore #delivery #deliveryboy #traffic pic.twitter.com/OBEwmghc1R
38 वर्षीय मोहनसुंदरम गेल्या दोन वर्षांपासून फूड एग्रीगेटर स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतात. त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी एका खासगी शाळेच्या बस चालकाने भरधाव वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवली होती. वर्दळीच्या रस्त्यावरील एका मॉलजवळ बस दोन दुचाकींना आणि एका वाटसरूला धडकणार होती. त्यांनी चालकाला विचारणा करताच काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कॉन्स्टेबलनं फूड डिलिव्हरी मॅनला दोनवेळा केली शिवीगाळ दुसर्या प्रवाशाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये, कॉन्स्टेबलनं डिलिव्हरी बॉयला दोनदा शिवीगाळ आणि कानशिलात मारताना, त्याचा मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि बाईकचंही नुकसान केलं. Big News: कारखान्यातील बॉयलरचा स्फोट, 12 जणांचा मृत्यू मोहनसुंदरम यांनी शनिवारी शहर पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबल सतीशला नियंत्रण कक्षात हलवले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

)







