बंगळुरू, 29 सप्टेंबर : रस्ते अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. बहुतेक वेळा यात चालत्या गाड्यांमध्ये टक्कर झाल्याचं, एखादी गाडी अनियंत्रित झाल्याचं, गाडी पुलावरून खाली कोसळल्याचं किंवा गाडीला आग लागल्याचं, गाडीखाली कुणीतरी चिरडल्याचं पाहिलं असेल. पण असे अपघात चालत्या गाड्यांमध्ये होतात. पण एखादी रस्त्याशेजारी उभी केलेली गाडीही जीवघेणी ठरू शकते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या एका गाडीमुळे भयंकर अपघात झाला आहे. पार्क केलेल्या एका कारचा दरवाजा उघडला आणि भयानक दुर्घटना घडली. धडकी भरवणारा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल. हे वाचा - Shocking! School Bus च्या दरवाजात अडकली चिमुकली, ड्रायव्हरने फरफटत नेलं; लक्ष गेलं तोपर्यंत… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. काही गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. तर काही रस्त्यावरून धावत आहे. समोरून एक बाईक येताना दिसते. ज्यावर दोन जण बसले आहेत. इतक्यात रस्त्याशेजारी असलेल्या कारमधील ड्रायव्हर त्याच्या जवळील दरवाजा उघडतो. जो रस्त्याच्या बाजूने असतो. कार ड्रायव्हर मागून येणाऱ्या बाईकला पाहत नाही. बाईकही वेगात असते. त्यामुळे काही कळायच्या आतच बाईक त्या कारच्या दरवाजाला धडकते.
त्याचवेळी समोरून एक ट्रक येतो. बाईकसह बाईकवरून तरुण रस्त्यावर कोसळतात आणि त्या ट्रकखाली जातात. ट्रक ड्रायव्हरलाही त्यावेळी काही समजत नाही. तो पुढे जाऊन लगेच गाडीला ब्रेक मारतो. कारचालकही त्या बाईकस्वारांजवळ धावत येतो. बाईकस्वार दोन्ही तरुण रस्त्यावर पडलेले दिसतात. त्यांच्यामध्ये काहीच हालचाल दिसत नाही आहे. या बाईकस्वारांचं पुढे काय झालं माहिती नाही. पण व्हिडीओ पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येतो.
" Please be aware when you are opening the doors of your vehicle and avoid fatal mishaps " @DgpKarnataka @CPBlr @AddlCPTraffic @jointcptraffic @BlrCityPolice @blrcitytraffic @acpcentraltrf @acpeasttraffic @acpwfieldtrf @acpsetraffic pic.twitter.com/WPrL0POeLM
— DCP Traffic East ಉಪ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಸಂಚಾರ ಪೂರ್ವ (@DCPTrEastBCP) September 28, 2022
बंगळुरू पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जनजागृती म्हणून हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - Shocking Video - बंद गाडीसमोर चुकूनही उभं राहू नका; भयंकर दृश्य CCTV मध्ये कैद मागेपुढे न पाहता कारचा दरवाजा उघडणं यात अनेकांना काहीच चूक वाटत नाही. पण हीच गोष्ट कुणाच्या तरी जीवावर बेतू शकते. त्यामुळे ही चूकच नाही तर मोठा गुन्हाच आहे, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे कारचा दरवाजा उघडताना सावध राहा आणि अशा दुर्घटना टाळा, असं आवाहन बंगळुरू पोलिसांनी केलं आहे.