मुंबई, 20 सप्टेंबर : एखादी गाडी बंद असली, रस्त्यात उभी असली किंवा बिघडलेली असली की आपण बिनधास्तपणे त्याच्यासमोर उभे राहतो. त्या गाडीपासून आपल्याला काही धोका नाही असं वाटतं. पण गाडी बंद असली, बिघडलेली असली तरी किती खतरनाक ठरू शकते, याचाच धक्कदायक व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भयंकर दृश्य कैद झालं आहे. एक गाडी बंद पडली होती, ती दुरूस्तीसाठी गॅरेजमध्ये आली. मेकॅनिक गाडी दुरूस्त करत होता. पण त्यानंतर कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं. पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्वकाही कैद झालं आणि हा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला. दृश्य पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता एक कार उभी दिसते आहे. कार बंद पडली आहे. एक व्यक्ती ती कार दुरूस्त करते आहे. त्यानंतर जशी ही व्यक्ती कारच्या समोर येते तशी ती कार अचानक सुरू होते. कार चालू लागते. हे वाचा - हा VIDEO पाहिला तर दुचाकीवर बसण्याआधी दहावेळा विचार कराल; यवतमाळमधील थरारक घटना जो मेकॅनिक ही कार दुरूस्त करतो आहे, त्याच मेकॅनिकच्या दिशेने ही कार जाते. मेकॅनिकही घाबरतो. पण त्याला पळण्यासाठी जागाही नसते कारण त्याच्या मागे असलेलं शटरही बंद आहे. त्यामुळे कार त्याच्या अंगावर जाते आणि ती त्या मेकॅनिकला चिरडते. काही सेकंदात सर्वकाही घडतं. तिथं उपस्थित लोकही शॉक होतात. त्यानंतर एक महिला तिथं येते आणि ती गाडीत बसून गाडी मागे घेताना दिसते.
#WARNING
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 13, 2022
If an automatic vehicle breaks down, never stand in front of the vehicle.#viral #ViralVideo #Accident pic.twitter.com/7pBEX1MkKL
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @sirajnoorani ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘ऑटोमॅटिक गाडी खराब झाली तर त्याच्यासमोर कधीच उभं राहू नका. नाहीतर तुमच्यासोबतही अशीच दुर्घटना होऊ शकते’, असा अलर्ट देण्यात आला आहे. हे वाचा - Excercise करताना एक छोटीशी चूक आणि तडफडू लागला तरुण; Gym मधील धडकी भरवणारा VIDEO अशी बंद गाडी ड्रायव्हरशिवाय अचानक सुरू झाल्याचं दृश्य तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं आहे. पण प्रत्यक्षातही असं घडू शकतं आणि ते जीवावर बेतू शकतं. त्यामुळे सावध राहा.