मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! School Bus च्या दरवाजात अडकली चिमुकली, ड्रायव्हरने फरफटत नेलं; लक्ष गेलं तोपर्यंत...

Shocking! School Bus च्या दरवाजात अडकली चिमुकली, ड्रायव्हरने फरफटत नेलं; लक्ष गेलं तोपर्यंत...

स्कूल बस ड्रायव्हरने मुलीला फरफटत नेलं.

स्कूल बस ड्रायव्हरने मुलीला फरफटत नेलं.

स्कूल बसमध्ये मुलीसोबत जे घडलं ते पाहून अंगावर अक्षरशः काटा येईल. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 27 सप्टेंबर : मुलांना घरापासून शाळेत सुरक्षितरित्या नेण्यासाठी स्कूल बस असतात. पण या स्कूल बसही सुरक्षित नाहीत का, असाच सवाल आता उपस्थित होतो आहे. याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हिडीओ. ज्यात  स्कूल बसमध्ये एका मुलीसोबत असं काही घडलं की व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येईल. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी बसच्या दरवाजाजवळ उतरण्यासाठी उभी आहे. बसचा दरवाजा ऑटोमॅटिक आहे. जशी ती मुलगी उतरते तसा दरवाजा आपोआप बंद होतो. पण तिची बॅग त्या दरवाजात अडकते. बस चालवणाऱ्या महिला ड्रायव्हरचंही त्या मुलीकडे लक्ष नसतं. तिच्याशेजारी असलेल्या व्यक्तीसोबत ती बोलताना दिसते आणि तशीच बस चालू करते. बस वेगाने धावू लागते. सोबत दरवाजात अडकलेली मुलगी बससोबत खेचली जाते. कित्येक किलोमीटपर्यंत बस ड्रायव्हर मुलीला असंच फरफटत नेते.

बसच्या कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.  काही अंतरानंतर बस ड्रायव्हरचं त्या मुलीकडे लक्ष जातं. जोपर्यंत ड्रायव्हरला त्याची चूक लक्षात येते तोपर्यंत मुलीला तिने फरफटत नेलंलं असतं. ती तात्काळ बस थांबवते. दरवाजा उघडून बसमधून बाहेर येते.

हे वाचा - Shocking! तरुणी अशा नाचल्या की 'धरतीही फाटली', त्यातच सामावल्या सर्व जणी; Watch Video

सुदैवाने मुलीला काही झालं नाही. मुलीचं नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला.  जर ती बसच्या चाकाखाली  गेली असती तर तिचा मृत्यूही झाला असता.

अमेरिकेच्या केंटकीमधील ही घटना आहे. 2015 सालातील ही घटना आहे, पण हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. डीन ब्लँडेल नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. स्कूल बसच्या महिला ड्रायव्हरला नोकरीवरून काढण्यात आलं आहे आणि तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

हे वाचा - आकाशात उडता उडता एकमेकांत अडकली 2 विमानं आणि..., भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; Watch Video

हा व्हिडीओ पाहून सर्वांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. ड्रायव्हरचं याकडे लक्ष कसं गेलं नाही, याबाबत प्रश्नचिन्हं व्यक्त केलं जातं आहे.

First published:

Tags: Viral, Viral videos