जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे...इतके लांब कान! या कुत्र्याच्या नावावर आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

बापरे...इतके लांब कान! या कुत्र्याच्या नावावर आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

बापरे...इतके लांब कान! या कुत्र्याच्या नावावर आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

या श्वानाच्या कानाची लांबी पृथ्वीवरील सर्व कुत्र्यांमध्ये सर्वाधिक (Dog with Longest Ear) आहे. याच कारणामुळे त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवलं गेलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 सप्टेंबर : जगात एकापेक्षा एक अजब रेकॉर्ड (Weird Records) आहेत. असाच एक विचित्र रेकॉर्ड अमेरिकेत राहणाऱ्या एका कुत्र्याच्या नावावरही नोंदवला गेला आहे. या श्वानाचं नाव लू असं असून त्याच्या कानाची लांबी पृथ्वीवरील सर्व कुत्र्यांमध्ये सर्वाधिक (Dog with Longest Ear) आहे. याच कारणामुळे त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवलं गेलं आहे. धक्कादायक! …म्हणून बॉयफ्रेंडनं डोळ्यात टाकला Glue; भयंकर झाली तरुणीची अवस्था गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या (Guinness World Records) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षीय लू या कुत्र्याच्या कानाची लांबी 13.38 इंच आहे. लूच्या कानाची लांबी पृथ्वीवर जिवंत असणाऱ्या कुत्र्यांमध्ये सर्वाधिक आहे. याचमुळे त्याचा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश आहे. लू ओरेगनमध्ये आपल्या मालकिणीसोबत राहतो. मालकिणीनं सांगितलं, की लूचे कान मोठे असल्याचं त्यांना आधीपासूनच माहिती होतं. मात्र, त्यांनी कधीही त्याची लांबी मोजली नव्हती. श्वानाची मालकीण पेग ऑल्सेन (Paige Olsen) हिनं सांगितलं, की तिनं जेव्हा पहिल्यांदा लू याला पाहिलं तेव्हाच तिला तो खूप आवडला आणि तिनं त्याला अॅडॉप्ट केलं. ती त्याचे लांब कान नेहमी नोटीस करत असे. अखेर कोरोना महामारीच्या काळात तिनं त्याच्या कानांची लांबी मोजण्याचा निर्णय घेतला. त्यात त्याचे कान 34 सेंटीमीटर म्हणजेच 13.38 असल्याचं स्पष्ट झालं. अखेर त्याच्या या वेगळेपणामुळे लूचं नाव प्रसिद्ध झालं. लू काळ्या आणि टॅन कलरचा कुत्रा असून त्याचे लांब कान त्याचं सौंदर्य आणखीच वाढवतात. बापरे! चक्क डोळ्यांनी मेणबत्ती विझवते ही महिला; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी पेग ऑल्सेनचं म्हणणं आहे, की लू ज्या प्रजातीचा आहे त्या प्रजातीमधील कुत्र्यांचे कान इतर कुत्र्यांच्या तुलनेत लांब असतात. तिचं म्हणणं आहे की लू याचे लांब काम त्याची शारीरिक समस्या नाही. त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कानांना हात लावायची इच्छा होते आणि सगळेच त्याच्याकडे आकर्षित होतात. ऑल्सेन सांगते, की त्यांचा हा प्रेमळ श्वान डॉग शोमध्येही भाग घेतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात