Home /News /viral /

बापरे! चक्क डोळ्यांनी मेणबत्ती विझवते ही महिला; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी

बापरे! चक्क डोळ्यांनी मेणबत्ती विझवते ही महिला; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी

इंग्लंडमध्ये राहणारी दोन मुलांची आई असलेली एमा (Emma) आपल्या एका डोळ्यानं फुंकून मेणबत्ती विझवते (Woman Blows Candle With Eyes). कॅन्सरमुळे तिचा एक डोळा काढून टाकण्यात आला आहे.

    नवी दिल्ली 26 सप्टेंबर : तुम्ही कधी कोणाला डोळ्यांनी मेणबत्ती विझवताना पाहिलंय का? आजपर्यंत तुम्ही लोकांना तोंडानं मेणबत्ती विझवतानाच पाहिलं असेल. मात्र, इंग्लंडमध्ये राहणारी दोन मुलांची आई असलेली एमा (Emma) आपल्या एका डोळ्यानं फुंकून मेणबत्ती विझवते (Woman Blows Candle With Eyes). कॅन्सरमुळे तिचा एक डोळा काढून टाकण्यात आला आहे. आता तिथे केवळ एक छिद्र आहे. याच छिद्रातून ती मेणबत्ती विझवते. डोळ्यांनी मेणबत्ती विझवतानाचे अनेक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर (Video on Social Media) केले आहेत. OMG! युवकानं गिळला जिवंत साप; जीभ आणि घशाची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावले जून 2018 मध्ये झालेल्या सर्जरीनंतर एमाला एकच डोळा आहे. एमाला रेअर ट्यूमर (Tumor) झाला होता, याला Mesenchymal Chondrosarcoma म्हणतात. डॉक्टरांनी तिला सांगितलं, की इंग्लंडमध्ये राहणारी ती अशी एकमेव व्यक्ती होती, जी 15 वर्षांपासून या ट्यूमरसोबत जगत होती. तिच्या डाव्या डोळ्यांमध्ये अनेक वर्ष हा ट्यूमर होता. याची माहिती एमाला तेव्हा मिळाली जेव्हा ती रुग्णालयात गेली. अचानकच तिचे डोळे सुजण्यास सुरुवात झाली होती. यानंतर तिला आपल्याला कॅन्सर असल्याचं समजलं. एमाचा हा ट्यूमर 15 वर्ष जुना झाला होता. 2017 मध्ये अचानक तिच्या डोळ्यांमध्ये दुखू लागलं. मात्र, जुन्या फोटोंच्या आधारे डॉक्टरांनी तिला सांगितलं, की तिचा ट्यूमर अतिशय जुना आहे. इंग्लंडच्या टॉप सर्जननं ट्यूमर ऑपरेट केला. एमाचा डावा डोळा काढून टाकावा लागला. असं न केल्यास कॅन्सर इतर भागात पसरण्याची शक्यता होती. जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिचा डोळा काढला. सध्या एमाच्या डोळ्यांचं कनेक्शन तिच्या लंग्ससोबत केलं गेलं आहे. हेदेखील आता सर्जरीच्या माध्यमातून ऑपरेट केलं जाईल. पहिल्या नजरेत जुळलं प्रेम; लग्नानंतर पत्नीचं गुपित समोर आल्यानंतर पती हादरला! एमानं आपल्या डोळ्यात झालेल्या छिद्रातही क्रिएटिव्हिटी शोधून काढली. तिनं डोळ्यानं मेणबत्ती विझवण्याची कला शिकली. एमानं आपलं टिकटॉक अकाऊंट काढलं, यावत ती व्हिडिओ शेअर करते. तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हिडिओ भरपूर पसंतीही मिळते. तिच्या एका व्हिडिओला 15 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना तिचे व्हिडिओ प्रेरणादायी वाटतात. आपल्या या परिस्थितीवर एमानं म्हटलं की तिला स्वतःची काळजी नाबी. मात्र, तिला भीती आहे की हाच कॅन्सर तिच्या मुलांना होऊ नये.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Cancer, Viral news

    पुढील बातम्या