Home /News /viral /

धक्कादायक! ...म्हणून बॉयफ्रेंडनं डोळ्यात टाकला Glue; भयंकर झाली तरुणीची अवस्था

धक्कादायक! ...म्हणून बॉयफ्रेंडनं डोळ्यात टाकला Glue; भयंकर झाली तरुणीची अवस्था

अनेक वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लूनं एका व्यक्तीनं आपल्या गर्लफ्रेंडचे डोळेच चिकटवले (Glue in Girlfriend's Eye) . महिला आता प्रचंड वेदना सहन करत आहे

    नवी दिल्ली 26 सप्टेंबर : अनेक वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लूनं एका व्यक्तीनं आपल्या गर्लफ्रेंडचे डोळेच चिकटवले (Glue in Girlfriend's Eye) . महिला आता प्रचंड वेदना सहन करत आहे. अनेक प्रकारच्या ट्रिटमेंट घेऊनही आता तिचे डोळे पूर्वीसारखे होऊ शकतील का, हे सांगणं कठीण आहे. ही घटना ब्राझीलच्या (Brazil) कॅचियोइरो डी इतापेमिरिम शहरातील आहे. बाल्कनीत सुरू होता रोमान्स; न्यूड अवस्थेतच खाली कोसळली महिला अन्..., VIDEO 55 वर्षीय रेजिना अर्नाम ही ग्लूकोमा या गंभीर आजारानं त्रस्त आहे. यामुळे तिला दररोज आय ड्रॉपचा वापर करावा लागतो. ती हे आय ड्रॉप आपल्या घरातील फ्रीजमध्ये (Eye Drop In Refrigerator) स्टोर करून ठेवते. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या बॉयफ्रेंडनं ग्लूदेखील त्याच फ्रिजमध्ये ठेवला, जिथे रेजिनानं आय ड्रॉप ठेवले होते. रेजिनाच्या डोळ्यांमध्ये त्रास होऊ लागल्यानं तिनं आपल्या बॉयफ्रेंडची मदत मागितली. मात्र,, त्याला फ्रिजमध्ये असलेल्या गोंदच्या आणि आय ड्रॉपच्या बाटलीतील फरक लक्षात आला नाही आणि त्यानं रेजिनाच्या डोळ्यात आय ड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. डोळ्यात विषारी केमिकल्स असलेला ग्लू जाताच रेजिनाला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तिची डोळे पूर्णपणे चिकटल्यानंतर बॉयफ्रेंडला आपली चूक लक्षात आली. ग्लू आणि आय ड्रॉपच्या बाटल्याही सेम होत्या आणि त्यांची नावंही थोडीफार मिळतीजुळती होती. घटनेच्या वेळी तरुणानं आपला चष्मा लावलेला नव्हता. रेजिनानं सांगितलं, की ग्लूचा थेंब माझ्या डोळ्यात पडताच तीव्र वेदना होऊ लागल्या. असं वाटलं की आता माझा डोळा फुटणार आहे. लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आलं. रेजिनानं सांगितलं, की रात्रभर तिच्या डोळ्यात पाणी येत राहिलं. OMG! युवकानं गिळला जिवंत साप; जीभ आणि घशाची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावले नेत्रतज्ज्ञ लिआना टिटो म्हणाले, 'जेव्हा सुपरग्लू, किंवा अल्कोहोल युक्त जेलसारखी रासायनिक उत्पादने डोळ्यावर लावली जातात तेव्हा तीव्र जळजळ होते आणि त्याचा कॉर्निया आणि नेत्रश्लेष्मलावरही परिणाम होऊ शकतो. डोळ्याच्या आत ग्लू चिकटल्याने कवच तयार होऊन मोठी जखम होऊ शकते. ग्लू काढून टाकल्यानंतर रेजिनाचा डोळा आता उघडला गेला असला तरी तिच्या डोळ्यांचे किती नुकसान झाले आहे आणि ते किती काळ राहील हे स्पष्ट नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eyes damage, Viral news

    पुढील बातम्या