Home /News /viral /

तोंडात काठी पकडून श्वानाने केली तरुणीची धुलाई; VIDEO पाहून हैराण झाले नेटकरी

तोंडात काठी पकडून श्वानाने केली तरुणीची धुलाई; VIDEO पाहून हैराण झाले नेटकरी

एका श्वानाचा अतिशय मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Dog) समोर आला आहे. यात श्वानाने एका तरुणीला बदडल्याचं पाहायला मिळतं

  नवी दिल्ली 22 जानेवारी : कुत्रा आणि मांजराचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल (Viral Videos of Dog and Cat) होत राहतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळून हसवतात. तर, काही व्हिडिओ असे असतात, जे लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात. विशेषतः कुत्र्यांबद्दल बोलायचं झाल्यास, हे जगातील सर्वाधिक हुशार प्राणी समजले जातात आणि सोबतच तितकेच ईंमानदारही असतात. याच कारणामुळे जगभरातील अनेक लोक घरामध्ये कुत्रा पाळतात. नातेवाईकांनी पिशव्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकले पैसे, वरातीत नोटांचा सडा, VIDEO या श्वानांना काहीही शिकवलं तरी ते पटकन शिकतात. मग ते उठणं-बसणं असो किंवा खेळ खेळणं, एक-दोन वेळा सांगताच हे प्राणी या गोष्टी लगेचच कॉपी करतात. सध्या अशाच एका श्वानाचा अतिशय मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Dog) समोर आला आहे. अनेकदा मुलं घरात असं काहीतरी चुकीचं करतात की ते पाहून आई रागवते किंवा त्यांना मारू लागते. मात्र, तुम्ही कधी श्वानाने आईप्रमाणे एखाद्याला मारल्याचं पाहिलं आहे का? जर पाहिलं नसेल तर व्हायरल होणारा हा व्हिडिओ नक्की पाहा.
  यात एका श्वानाने एका तरुणीला बदडल्याचं पाहायला मिळतं. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुणी सोफ्यावर बसून श्वानाचा व्हिडिओ बनवत आहे. यानंतर श्वान आपल्या तोंडामध्ये एक काठी पकडून या तरुणीला बदडू लागतो. तरुणीही हसत या श्वानाचा मार खात आहे आणि याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. सेल्फी कॅमेरा ऑन करून काढत होता व्हिडिओ; इतक्यात मागून सिंह आला अन्..., VIDEO श्वानाचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक करत असून यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ doglovetreats नावाच्या अकाऊंटवर पाहू शकता. पेजच्या अॅडमिनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'डाय डाय डाय...'
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dog, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या