ही घटना गुजरातच्या मेहसाणा येथील लिंच या गावातील आहे. या घटनेत गावात एका लग्नाची वरात निघाली होती. यादरम्यान वरातीत सहभागी लोकांनी पिशवी भरून पैसे ढोल वाजवणाऱ्या लोकांसमोर ओतले. हे पैसे इतके जास्त होते, की पिशवीतून खाली ओतताच रस्त्यावर दूरपर्यंत पसरले. ढोल वाजवणारे काही व्यक्ती या पैशांवरुनच चालताना दिसत आहेत. नवरदेवाच्या बहिणीची नवरीसोबत विचित्र मस्करी; क्षणात दुःखात बदललं आनंदाचं वातावरण व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत भरलेले पैसे रस्त्यावर ओतताना दिसतो. यानंतर ढोल वादक या पैशांवरुन पळत आपला आनंद व्यक्त करतात. याशिवाय एक महिलाही पिशवीने रस्त्यावर पैसे ओतताना दिसते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बहुतेक नोटा 10 रुपयांच्या आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.गुजरात: पिशव्या भरून पैसे रस्त्यावर टाकले; वरातीतील VIDEO VIRAL pic.twitter.com/gYKrdlSVNM
— News18Lokmat (@News18lokmat) January 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Video Viral On Social Media