नवी दिल्ली 22 जानेवारी : ज्या सिंहाची डरकाळी ऐकून जंगलातील इतर प्राणीही थरथर कापतात, तोच सिंह अचानक तुमच्या समोर आला तर? नक्कीच तुमच्या डोक्यात हा विचार येईल, की पळ काढला तरीही आपलं वाचणं जवळपास अशक्यच आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा आणि सिंहाचा असा व्हिडिओ (Video of Lion) व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झाडाच्या खाली बसलेला दिसतो. इतक्यात त्याच्या मागील बाजूने एक सिंह येतो. यानंतर जे काही घडतं, ते पाहून नक्कीच तुम्हीही हैराण व्हाल. VIDEO - Surprise म्हणत दरवाजा उघडला पण…; अशा अवस्थेत दिसले पालक की पळाला लेक 19 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा व्यक्ती एका झाडाच्या कडेला बसलेला आहे. तो आपल्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन करून मागील दृश्य दाखवत आहे. या व्यक्तीला कल्पनाही आहे, की मागून एक सिंह त्याच्याकडे धावत येत आहे. मात्र, तरीही त्याच्या चेहऱ्यावर भीती नाही, तर हास्य दिसतं. या हिंस्त्र प्राण्याला पाहून मोठमोठ्या प्राण्यांचाही थरकाप उडतो, मात्र हा व्यक्ती अगदी आरामात तिथेच बसून हसत आहे. हे दृश्य पाहून तुम्हाला असं वाटेल, की हा व्यक्ती आता कामातून गेला. मात्र, असं काहीच होत नाही. हे दृश्य पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
सिंह आणि या व्यक्तीमधील अनोखी ट्यूनिंग दाखवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर waowafrica नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, चुपके-चुपके. इन्स्टाग्रामवर अपलोड झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेकजण या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. VIDEO - शेळीसाठी जीव घातला धोक्यात; श्वास घेणं मुश्किल अशा खड्ड्यात गेला अखेर… हा व्हिडिओ पाहून बहुतेक यूजर्स हैराण आहेत. काहींचं असं म्हणणं आहे, की त्यांना या व्यक्तीची काळजी वाटत आहे. मात्र, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेच हैराण झाले. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, मी त्या व्यक्तीच्या जागी पाहिजे होतो. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हा तर अतिशय क्यूट व्हिडिओ आहे, मी विनाकारण घाबरलो.