Home /News /viral /

VIDEO: चिमुकली पाण्यात बुडत असल्याचं दिसताच मदतीला धावला कुत्रा; असा वाचवला जीव

VIDEO: चिमुकली पाण्यात बुडत असल्याचं दिसताच मदतीला धावला कुत्रा; असा वाचवला जीव

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एका मुलीला बुडताना पाहून कुत्रा तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो.

    नवी दिल्ली 20 सप्टेंबर : अनेकदा आपण माणुसकी हा शब्द माणसांसाठीच वापरतो. मात्र, अनेकदा प्राणीदेखील अशी काही कामं करतात की त्यांच्यातच आपल्याला माणुसकीचं दर्शन घडतं. एखाद्याला अडचणीत पाहताच आपण मदतीसाठी पुढे येतो. असंच एक काम नुकतंच एका कुत्र्यानं (Viral Dog Video) केलं आहे. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एका मुलीला बुडताना पाहून कुत्रा तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो. मॉडेलिंग सोडून निवडलं हे प्रोफेशन अन् पालटलं तरुणीचं नशीब; रातोरात झाली करोडपती व्हिडिओमध्ये दिसतं, की समुद्राच्या किनाऱ्यावर एक मुलगी पाण्यात खेळत आहे. तिच्या जवळच एक कुत्राही उभा आहे. मात्र, इतक्यात एक लाट किनाऱ्यावर येऊन धडकते आणि यात ही चिमुकली पूर्णपणे भिजते. हे पाहून कुत्र्याला असं वाटतं, की ती पाण्यात बुडू शकते. घाबरून हा कुत्रा लगेचच मुलीचे कपडे पकडतो आणि तिला बाहेर ओढू लागतो. कुत्रा असं का करतोय हे या चिमुकलीलाही समजत नाही. मात्र, तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. OMG! चक्क सापांसोबत खेळत होता व्यक्ती अन्...; हा Video पाहून येईल अंगावर काटा काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. मन जिंकणारा हा व्हिडिओ ट्विटवर @buitengebieden_ नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ दिलेल्या कॅप्शनमध्ये नॅनी बॉय असं लिहिण्यात आलं आहे. हा व्हिडिओ 3 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोबतच 20 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे तर 2000 हून अधिकांनी रिट्विटही केला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dog, Viral video on social media

    पुढील बातम्या