मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! चक्क सापांसोबत खेळत होता व्यक्ती अन्...; हा Viral Video पाहून येईल अंगावर काटा

OMG! चक्क सापांसोबत खेळत होता व्यक्ती अन्...; हा Viral Video पाहून येईल अंगावर काटा

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात एक व्यक्ती अनेक सापांच्या मध्ये बसलेला दिसत आहे

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात एक व्यक्ती अनेक सापांच्या मध्ये बसलेला दिसत आहे

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात एक व्यक्ती अनेक सापांच्या मध्ये बसलेला दिसत आहे

नवी दिल्ली 20 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सापाचे व्हिडिओ (Viral Videos of Snake) अनेकदा व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हैराण (Shocking Video) करणारे असतात तर काही मजेशीर असतात. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती अनेक सापांच्या मध्ये बसलेला दिसत आहे आणि तो अतिशय आनंदात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी म्हटलं, की या व्यक्तीनं खतरों के खिलाडीमध्ये जायला हवं.

महिला डान्सरसह शालेय शिक्षकाचे जोरदार ठुमके; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

झूकीपर जे ब्रेवर (Zookeeper Jay Brewer) हे अनेकदा वेगवेगळ्या प्राण्यांसोबतचे आपले हैराण करणारे व्हिडिओ शेअर करत असतात. आपले हे व्हिडिओ ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतात. त्यांचे हे व्हिडिओ त्यांच्या फॅन्सला भरपूर आवडतात. त्यांनी शेअर केलेले काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही थरकाप उडवणारे असतात. सध्या व्हायरल होणाऱ्या त्यांच्या व्हिडिओमध्ये मोठमोठे साप पाहायला मिळतात.

हा व्हिडिओ शेअर करत जे ब्रेवर यांनी लिहिलं, की हे घरी करून पाहू नका, मात्र नेहमीप्रमाणेच तुमच्या सर्वांचे आभार....नेहमी प्राण्यांसोबत मस्ती करत राहा. व्हिडिओमध्ये ते मोठमोठ्या सापांच्या मध्ये बसलेले दिसत आहेत. ब्रेवरनं आपल्या फॉलोअर्सचे आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये हसत हसत ते हे बोलताना दिसतात, की मला नाही माहिती काय सुरू आहे, मात्र मला असं वाटतंय की मी इथे पूर्ण रात्र घालवणार आहे.

'मला माझा बाप्पा परत द्या', चिमुरडी मुलं हमसून हमसून रडली, VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ अपलोड केल्यापासून याला 1.2 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटत आहे. एका यूजरनं हे अविश्वसनीय असल्याचं म्हणत ब्रेवर यांचं कौतुक केलं आहे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं त्यांना खतरो के खिलाडीमध्ये जाण्याचा सल्लाही दिला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Snake video