मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चक्क कुत्र्यानं वाचवला माशाचा जीव; हा VIRAL VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

चक्क कुत्र्यानं वाचवला माशाचा जीव; हा VIRAL VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

एक कुत्रा माशांची (Fish) मदत करण्याचा आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) कोणाचंही मन जिंकेल

एक कुत्रा माशांची (Fish) मदत करण्याचा आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) कोणाचंही मन जिंकेल

एक कुत्रा माशांची (Fish) मदत करण्याचा आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) कोणाचंही मन जिंकेल

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे लाखो व्हिडिओ (Animal Videos) आणि फोटो उपलब्ध आहेत. प्राण्यांसंबंधीच्या कंटेंटला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. प्राण्यांचे काही व्हिडिओ मजेशीर आणि क्यूट असतात. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या एका कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Dog) होत आहे. यात हा कुत्रांना माशांची मदत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य येईल.

पाकिस्तानी न्यूज अँकरचे प्रश्न ऐकून पाहुण्यांना आवरेना हसू, पाहा VIDEO

बहुतेकांचा असा समज असतो, की प्रेम आणि राग हे गुण केवळ माणसांमध्येच असतात. मात्र, प्राण्यांमध्येही हे गुण असतात. तेदेखील एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत असतात. याचंच उदाहरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. यात दिसतं, की एक कुत्रा माशांची (Fish) मदत करण्याचा आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ कोणाचंही मन जिंकेल कारण हा कुत्रा कोणत्याही परिस्थितीत माशाचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.

घरी येताच पत्नीने दिली Good News! प्रेग्नेन्सी टेस्ट पाहताच नवरा हादरलाच!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती पाण्यातील मासे पकडत आहे. त्याच्यासोबत एक कुत्राही आहे. हा व्यक्ती एक एक मासा पकडून शेजारी ठेवलेल्या टबमध्ये टाकत आहे. याच दरम्यान कुत्रा टबच्या जवळ जातो आणि माशांनी भरलेला हा टब पाण्यात टाकतो. हे पाहून मासे पकडणारा व्यक्ती कुत्र्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या कुत्र्याला माशांचा जीव वाचवायचा आहे. कुत्रा या व्यक्तीला मागे ढकलतो आणि माशांना पाण्यात फेकतो. हा व्हिडिओ लोकांची मनं जिंकत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ animals_dose नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

First published:

Tags: Dog, Fish