जाहिरात
मराठी बातम्या / Viral / याला म्हणतात जिद्द; हिंस्त्र चित्त्यासोबत अखेरपर्यंत लढला कुत्रा, VIDEO चा शेवट बघाच

याला म्हणतात जिद्द; हिंस्त्र चित्त्यासोबत अखेरपर्यंत लढला कुत्रा, VIDEO चा शेवट बघाच

याला म्हणतात जिद्द; हिंस्त्र चित्त्यासोबत अखेरपर्यंत लढला कुत्रा, VIDEO चा शेवट बघाच

व्हिडिओमध्ये एका चित्त्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतं (Cheetah attack on Dog). मात्र, कुत्र्यानेही हार न मानता शेवटपर्यंत चित्त्याविरोधात लढा दिल्याचं पाहायला मिळतं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 जानेवारी : चपळता असलेले अनेक प्राणी आहेत. मात्र तरीही चपळता हा शब्द आला की प्रत्येकजण चित्ताचंच उदाहरण देतो. कारण चित्त्यासारखी अद्भूत चपळता क्वचितच इतर कोणत्या प्राण्यात दिसते. त्यामुळेच या क्रूर शिकाऱ्याने कोणावर हल्ला केल्यास त्या प्राण्याचं वाचणं जवळपास अशक्यच असतं. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Video of Dog) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका कुत्र्याने असं काही करून दाखवलं, जे पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. व्हिडिओमध्ये एका चित्त्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतं (Cheetah attack on Dog). मात्र, कुत्र्यानेही हार न मानता शेवटपर्यंत चित्त्याविरोधात लढा दिल्याचं पाहायला मिळतं. इंटरनेटवर सध्या या कुत्र्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की जंगलातून भटकलेला एक चित्ता रहिवासी भागात शिरतो. यानंतर चित्ता काळ्या रंगाच्या एका कुत्र्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर कुत्रा जे काही करतो, ते पाहून तुम्हीही नक्कीच त्याचं कौतुक कराल. …अन् भडकलेल्या हत्तीने प्रवाशांनी भरलेली कार केली पलटी; पाहा Shocking Video आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदवर असलेल्या प्राण्यासोबत हा कुत्रा लढा देतो. यात चित्त्याने कुत्र्याची मान आपल्या जबड्यात पकडल्याचं दिसतं. मात्र तरीही कुत्रा चित्त्याचा सामना करताना दिसतो आणि तो शेवटपर्यंत हार मानत नाही. अखेर चित्ताच तिथून धूम ठोकतो.

जाहिरात

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 12 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्सनी कुत्र्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की या कुत्र्याने अतिशय धाडसाने चित्त्याचा सामना केला आहे.

Shocking video! कुत्राही असं काही करू शकतो; त्याचं खतरनाक रूप CCTV मध्ये कैद

काही यूजर्स त्या व्यक्तीवर भडकले आहेत, ज्याने कुत्र्याचा आणि चित्त्याचा हा व्हिडिओ शूट केला आहे. यूजर्सचं असं म्हणणं आहे, की त्या व्यक्तीने चित्त्याला तिथून पळवून लावायला हवं होतं. यावर प्रतिक्रिया देत काही यूजर्सनी म्हटलं की चित्त्यासारख्या हिंस्त्र प्राण्याचा सामना कोण करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात