नवी दिल्ली 19 जानेवारी : हत्तींची गणना खरंतर जगातील सर्वात समजदार प्राण्यांमध्ये होते. हा प्राणी अतिशय शांत आणि लाजाळू असल्याचं मानलं जातं. मात्र, जर या प्राण्याला राग आलं, तर त्याच्यासमोर कोणीच टिकू शकत नाही. याच कारणामुळे जंगलाचा राजा सिंहदेखील या प्राण्यापासून सुरक्षित अंतर ठेवतो. सोशल मीडियावर हत्तींचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल
(Viral Videos of Elephant) होत असतात. मात्र सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, तो हैराण करणारा आहे.
या पुलावर पोहोचल्यावर कुत्रे आत्महत्या करतात? आजही उलगडलं नाही आहे हे गूढ
ही घटना दक्षिण आफ्रिकेतील आहे. इथे इसिमंगलिसो वॅटलँड पार्कमध्ये एका रागावलेल्या हत्तीने प्रवाशांनी भरलेली एसयूव्ही कार पलटी
(Elephant Attack on SUV Car) केली. हा व्हिडिओ तिथेच उपस्थित असलेल्या दुसऱ्या कारमधील लोकांनी रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ खरंच हैराण करणारा आहे.
अवघ्या 16 सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की भडकलेला हत्ती रस्त्यावर उभा राहून एसयूव्ही कारला आपल्या सोंडेनं धक्का देत आहे. जोपर्यंत कार पलटी होत नाही, तोपर्यंत तो धक्का मारत राहातो. मात्र, कार पलटल्यानंतरही त्याचं समाधान होत नाही आणि तो कारला तोपर्यंत धक्का देत राहातो, जोपर्यंत ती रस्त्याहून खाली जात नाही. यादरम्यान व्हिडिओ बनवणारे लोक कारचा हॉर्न वाजवून हत्तीचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्याने या कारचा पाठलाग करणं सोडावं.
या हैराण करणाऱ्या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की प्राण्यांना कधीही राग आणून देऊ नये, याचा परिणाम अतिशय वाईट होतात. एका यूजरने लिहिलं, मला पूर्ण विश्वास आहे की या कारमधील लोकांनी वारंवार हॉर्न वाजवून हत्तीला त्रास दिला असणार. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याला त्रास दिल्यावर असंच होतं.
अनेकदा पर्यटक जंगलात फिरण्यासाठी जातात तेव्हा मोठमोठ्याने गाड्यांचे हॉर्न वाजवतात. यामुळे तिथल्या प्राण्यांना याचा त्रास होतो आणि हत्तींचे कान तर अतिशय संवेदनशील असतात. त्यांच्या कानाला गाडीचा हॉर्न अतिशय कर्कश वाटतो. यामुळे हॉर्नचा आवाज ऐकून हत्ती भडकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.