मुंबई, 18 जानेवारी : हल्ली बहुतेकांच्या घरात कुत्रा पाळला जातो. घरात कुत्रा नसेल तर आपल्या परिसरात एखादा कुत्रा फिरतच असतो. त्यामुळे त्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते काय करू शकतात, काय नाही याची पुरेपूर कल्पना आपल्याला असते. पण सध्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने असं काही केलं की पाहून सर्वांना मोठा धक्का बसला आहे. किंबहुना कुणाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही आहे (dog shocking video).
कुत्र्याचं असं रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल. कुत्र्याचं खतरनाक असं रूप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे, जे तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसावं.
व्हिडीओत पाहू शकता एका तारेच्या कुंपणाजवळ एक कुत्रा उभा आहे. कुंपणावर एक छोटासा पक्षी बसला आहे. कुत्रा आधी त्या पक्ष्याकडे टकमका पाहतो. त्यानंतर आपल्या दोन्ही पायांवर उभा राहून त्या पक्ष्याच्या अगदी जवळ जातो. तसं प्राणी-पक्ष्यांनाही आपल्याला कुणापासून धोका आहे, कुणापासून नाही हे माहिती असतं. तसं या पक्ष्याला कुत्र्यापासून धोका नसल्याचं दिसलं म्हणून तो तसाच तिथंच शांत बसून राहिला.
हे वाचा - मुंबईकरांनो सावधान! या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; CCTV मध्ये कैद झालं दृश्य
पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही शॉक व्हाल (Dog swallowed bird alive video). पक्ष्याकडे टकामका पाहणारा कुत्रा अवघ्या काही क्षणातच त्या पक्ष्याला आपल्या तोंडात घेतो (Dog eating bird alive video). जिवंतच तो त्याला खातो. व्हिडीओ पाहूनही आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही (dog attack on bird video).
कुत्र्यांना तसं नॉनव्हेज आवडतं. पण कधी ते जिवंत प्राणी-पक्ष्याची शिकार करत नाहीत. पण या व्हिडीओत मात्र एक कुत्रा चक्क एका जिवंत पक्ष्याला खाताना दिसला.
हे वाचा - श्वानावर जडलं पोपटाचं प्रेम; अनोख्या अंदाजात केलं प्रपोज, VIDEO जिंकेल तुमचं मन
nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटिझन्स हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. त्यावर शॉकिंग कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.