• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, मन हेलावणारा VIDEO

समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, मन हेलावणारा VIDEO

गुरुवारी रात्री या गावात एक बिबट्या शिरला. जेव्हा हा बिबट्या एका कुत्र्याच्या जवळून जात होता, तेव्हा कुत्रा इतका घाबरला की त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

 • Share this:
  जोधपूर 06 नोव्हेंबर : ही गोष्ट खरी आहे, की प्राणी असो किंवा माणूस भीती सर्वांनाच वाटते. एखाद्या गोष्टीमुळे जेव्हा धक्का बसतो किंवा तीव्र वेदना होतात तेव्हा हृदयविकाराचा झटका येणं सामान्य बाब आहे. असंच एक प्रकरण सध्या राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधील (Jodhpur) तिंवरी गावातून समोर आलं आहे. गुरुवारी रात्री या गावात एक बिबट्या शिरला. जेव्हा हा बिबट्या एका कुत्र्याच्या जवळून जात होता, तेव्हा कुत्रा इतका घाबरला की त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच (CCTV Footage) कैद झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Shocking Video Viral) चांगलाच व्हायरल होत आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये ढेकणांचा धुमाकूळ, शेकडो किड्यांनी शोषलं रक्त बिबट्याला पाहून आधी दोन कुत्रे त्याच्याकडे धावले. मात्र, जेव्हा त्यांना जाणवलं की हा भयंकर प्राणी आहे, तेव्हा ही दोन्ही कुत्री मागे वळून पळू लागली. यादरम्यान गडबडीत दोन्ही कुत्रे खाली कोसळले. जो कुत्रा बिबट्याच्या जवळ होता, तो इतका घाबरला की त्याला हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळीच या कुत्र्याचा तडफडून मृत्यू झाला. सुदैवानं गावातील नागरिक आणि लहान मुलं दिवाळीनिमित्त फटाके फोडून आपल्या घरांमध्ये परतले होते. अन्यशा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. गावात बिबट्या शिरल्याचे वृत्त समजताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अजून वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत, तसंच प्रशासनानंही काही पाऊलं उचललेली नाहीत. सीसीटीव्हीत दिसणारा प्राणी हा बिबट्या असण्याची शक्यता असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. श्रावणसिंग राठोड यांनी सांगितले. ते म्हणाले, की त्यांच्याच टीमने 2019 मध्ये याच गावातून एका बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं. ...अन् अचानक मांडीवर येऊन बसला साप; पाहा पुढे काय घडलं, धडकी भरवणारा VIDEO राठोड म्हणाले, की आधी वनविभागाची टीम पगमार्कच्या माध्यमातून याची खात्री करून घेईल की हा बिबट्याच होता. यानंतर त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जाईल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जोधपूरमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: