साऊथ वेल्स, 5 नोव्हेंबर: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (Bed bugs bite female and her children in five star luxurious hotel) आराम करण्याच्या इराद्यानं गेलेल्या महिलेला पश्चात्तापाला सामोरं जावं लागलं. आरामदायी वेळ घालवण्याच्या उद्देशानं माणसं फाईव्ह (Reasons to go to five star hotel) स्टार हॉटेलमध्ये जातात. चांगलं अन्न, चांगली सेवा आणि आरामदायी झोप मिळावी, या कुठल्याही हॉटेलमध्ये जातानाच्या किमान अपेक्षा असतात. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तर अधिक उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतात. त्यामुळेच अनेकजण अधिकच पैसे मोजून तिथं उतरायला तयार असतात. मात्र नुकताच एका कुटुंबाला आलेला फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव (worst experience in five star hotel) धक्कादायक होता.
झोपेत केला ढेकणांनी हल्ला
अमेरिकेच्या साऊथ वेल्समधील साराह फिंच ही आपल्या मुलांसह सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मेक्सिकोला गेली होती. तिथल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचा तिने निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ तिला चांगलाच महागात पडला. दिवसभर शहरात वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन थकलेली साराह ही तिच्या दोन मुलांसोबत हॉटेलमध्ये आली. रात्रभर सुखाची झोप घेण्याचा तिचा बेत होता. मात्र हॉटेलमधील ढेकणांनी हा बेत हाणून पाडला.
झोपेत केला हल्ला
रात्री दिवे बंद करून झोपल्यानंतर काही मिनिटांतच ढेकून चावायला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काही मिनिटांत तर ढेकणांनी अक्षरशः हल्लाबोल केला. साराहला ढेकून चावल्यामुळे जाग आली. तिने पटकन लाईट लावली आणि बेडवरचं चित्र पाहून तिला जबर धक्का बसला. बेडवरच्या गादीखाली लपून बसलेले शेकडो ढेकून वर आले होते आणि ते मुलांना चावे घेत होते. साराहच्या हातावर आणि पायावर अनेक ठिकाणी ढेकूण चावल्यामुळे त्वचा लालेलाल झाली होती. एक वर्षांचं बाळ तर ढेकूण चावल्यामुळे रडू लागलं होतं आणि तिचा चार वर्षाचा मुलगा भांबावन गेला होता.
हे वाचा- क्रूरता! BFच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, दारू पाजून पाय तारेनं बांधले अन्
उलटी आल्याचा दावा
इतके ढेकून एकत्र पाहून आपल्याला त्रास तर झालाच, शिवाय उलटीदेखील आली, असा अनुभव साराहने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यावर अनेकांनी आपापले अनुभव शेअर केले आहेत. हॉटेल फाईव्ह स्टार असेल तरी रुम बुक करण्यापूर्वी खातरजमा करून घेण्याचा सल्ला अनेकजण देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.