नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे भरपूर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. यातील काही व्हिडिओ अतिशय खास असतात तर काही हैराण करणारे. आता सापाचाच विषय घेतला तर सापाचं नाव घेताच अनेकांना भीती वाटते. सापाची भीती जवळपास सर्वांनाच वाटते. अशात एखाद्याच्या मांडीवर जर साप येऊन बसला तर त्याची काय अवस्था होईल, याचा विचार करा. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Snake) होत आहे. यात दिसतं, की एक साप व्यक्तीच्या मांडीवर चढतो. यानंतर हा व्यक्ती अतिशय शांतपणे स्वतःचा जीव वाचवतो.
Amazon वरुन ऑर्डर केला पासपोर्ट कव्हर; डिलिव्हर झालेली वस्तू पाहून बसला धक्का
हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आङे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक साप व्यक्तीच्या मांडीवर येऊन बसतो. साप आपल्या मांडीवर बसल्याचं पाहिल्यानंतर हा व्यक्ती अजिबातही हालचाल करत नाही. मात्र, शेवटी तो एका काठीने सापाला स्पर्श करतो. यानंतर साप बाजूला होतो आणि या व्यक्तीच्या मागे जाऊन लपतो. साप बाजूला होताच हा व्यक्ती उठून उभा राहतो आणि आपला जीव वाचवतो.
OMFG!!! Thought everyone should see this. pic.twitter.com/nNKl3bdsrC
— Jamie Gnuman197... (@Jamie24272184) November 2, 2021
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही अंदाज आला असेल की या व्यक्तीनं थोडा हलगर्जीपणा केला असता तरी त्याला जीव गमवावा लागला असता. मात्र, केवळ आपली योग्य हालचालींमुळे त्याने स्वतःचा जीव वाचवला.
‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नवरीबाईचे जबरदस्त ठुमके; हा Dance Video एकदा बघाच
सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. तुम्ही Jamie24272184 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी लाईकही केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या. एका यूजरनं लिहिलं, की हा अतिशय भीतीदायक व्हिडिओ आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की अनेकदा तुम्ही इतके नशीबवान नसता, की सापाच्या तावडीतून वाचू शकाल. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.