नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : स्वतःवर विश्वास आणि प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र माणसांसाठी वापरली जाणारी ही वाक्यं अनेकदा प्राण्यांच्या बाबतीतही खरी ठरतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Wild Animals Shocking Video) होत आहे. यात दिसतं की आपल्यातील आत्मविश्वासाने एका कुत्र्याने चक्क जंगलाच्या राजालाही हार मानण्यास भाग पाडलं (Viral Video of Dog and Lion). मगरीने श्वानाला पाण्यात ओढताच मालकानेही घेतली उडी अन्…, थरकाप उडवणारा VIDEO कुत्रा सिंहासोबत भिडू शकतो, अशी कल्पनाही आपण कधी केली नसेल. सिंहासमोर जंगलातील प्राणीच नाही तर माणसंही घाबरून धूम ठोकतात. अशात एखादा कुत्रा जर सिंहासमोर न घाबरता उभा राहिला तर नक्कीच आश्चर्य़ वाटेल. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जखमी कुत्र्याने असं काही करून दाखवलं (Dog Defeat Lions), ज्याबद्दल सामान्य प्राणी विचारही करू शकत नाहीत. सिंह-सिंहिणीला त्याने अशी अद्दल घडवली की संपूर्ण जंगल बघत राहिलं. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
कुत्रा आणि सिंहाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होत आहे. यात कुत्र्याने न लढताच सिंहाचा सामना केला. कुत्र्याची हिंमत आणि आत्मविश्वास पाहून सगळेच थक्क झाले. केन्याच्या जंगलात सिंह आणि सिंहीण आराम करत होते. इतक्यात एक कुत्रा त्यांच्याजवळ आला, त्याच्या पायाला दुखापत झालेली होती. सिंह-सिंहीण त्याच्याजवळ हल्ला करण्यासाठी जाताच कुत्रा त्यांच्यावर झेप घेत भुंकू लागला. सिंह-सिंहीणीनेही कुत्र्याला अद्दल घडवण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्रा न घाबरता त्यांच्यासोबत भिडत राहिला. अखेर कुत्र्याच्या आत्मविश्वासापुढे सिंह-सिंहिणीनेही हार मानली.
शिकार करण्यासाठी बिबट्याने घेतली पाण्यात उडी अन्..; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ
असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. त्यामुळेच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. केन्याच्या जंगलात रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडिओ 2018 साली EcoTraining TV नावाच्या यूट्यूब चॅनेलवरुन शेअर केला गेला होता. आता तीन दिवसाआधी sucess.steps नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड झाल्यापासून हा व्हिडिओ 10 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओमधून हीच शिकवण मिळते, की कधीकधी ताकदीपेक्षाही आत्मविश्वास आणि लढण्याची जिद्द महत्त्वाची असते.