जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मगरीने श्वानाला पाण्यात ओढताच जीवाची पर्वा न करता मालकाने घेतली तलावात उडी अन्..., थरकाप उडवणारा VIDEO

मगरीने श्वानाला पाण्यात ओढताच जीवाची पर्वा न करता मालकाने घेतली तलावात उडी अन्..., थरकाप उडवणारा VIDEO

मगरीने श्वानाला पाण्यात ओढताच जीवाची पर्वा न करता मालकाने घेतली तलावात उडी अन्..., थरकाप उडवणारा VIDEO

श्वानाचा जीव वाचवण्यासाठी हा व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात टाकतो. या घटनेचा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या अंगावरही काटा आला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी: सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात आणि अशाच आगळ्यावेगळ्या व्हिडिओंना यूजर्सची मोठी पसंती मिळते. यातील बहुतेक व्हिडिओ हे प्राण्यांचेच असतात. नेटकऱ्यांना पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ (Videos of Pet Animals) जास्त आवडतात. पाळीव प्राणी हे अगदी कमी वेळातच आपल्या घरातील एका सदस्याप्रमाणे वाटू लागतात. त्यामुळे या प्राण्यांना काही त्रास सहन करावा लागल्यास मालकालाही वाईट वाटतं. शिकार करण्यासाठी बिबट्याने घेतली पाण्यात उडी अन्..; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका व्यक्तीने आपल्या पाळीव श्वानाला मृत्यूच्या दारातून परत आणल्याचं पाहायला मिळतं. श्वानाचा जीव वाचवण्यासाठी हा व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात टाकतो. या घटनेचा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या अंगावरही काटा आला आहे. हा व्हिडिओ इतका भीतीदायक आहे, की कोणीही आपल्या घरातील पाळीव प्राण्याला अशाप्रकारे मृत्यूच्या दारात जाताना पाहू शकत नाही.

जाहिरात

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तलावात काहीतरी करत असल्याचं सुरुवातीला जाणवतं. नंतर समजतं की हा व्यक्ती आपल्या हातांनी मगरीच्या पिल्लाला पकडून बाहेर आणत आहे (Man Saves Pet Dog from Crocodile). या पिल्लाच्या तोंडात व्यक्तीचा पाळीव श्वान अडकला आहे. यानंतर हा व्यक्ती आपली संपूर्ण ताकद वापरून आपल्या श्वानाला मगरीच्या जबड्यातून बाहेर काढतो आणि त्याचा जीव वाचवतो.

कुत्र्याला तोंडाने श्वास द्यायला गेली व्यक्ती अन्…; पुढे काय घडलं पाहा VIDEO

या संपूर्ण घटनेदरम्यान हा व्यक्ती एका मिनिटासाठीही आपल्या जीवाची पर्वा करताना दिसत नाही. मगरीचं पिल्लू श्वानाला आपल्या जबड्यात पकडून पाण्यात घेऊन जातं. या तलावात पिल्लू आहे, म्हणजेच मोठी मगर असण्याची शक्यताही दाट आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या जीवालाही धोका आहे. मात्र, तरीही त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता श्वानाला वाचवलं. यूजर्स या मालकाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात