जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिकार करण्यासाठी बिबट्याने घेतली पाण्यात उडी अन्..; 15 सेकंदाच्या VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

शिकार करण्यासाठी बिबट्याने घेतली पाण्यात उडी अन्..; 15 सेकंदाच्या VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

शिकार करण्यासाठी बिबट्याने घेतली पाण्यात उडी अन्..; 15 सेकंदाच्या VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या पाण्यात अगदी खोलवर जातो. तो आपल्या पंजाने पाण्याच्या आत आपली शिकार पकडण्याचा प्रयत्न करतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (Social Media) निरनिराळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र लोकांना असेच व्हिडिओ पाहायला आवडतात जे काहीतरी वेगळे किंवा आश्चर्यचकीत करणारे असतात. इथे प्राण्यांचे अनेक हैराण करणारे व्हिडिओ समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. ऐकावं ते नवल! सोशल मीडियावर बटाट्याबाबत कमेंटमुळे वांदा; महिलेला FB ने केलं बॅन जंगलात सिंह, बिबट्यासारख्या प्राण्यांना एखाद्याची शिकार करणं अजिबातही अवघड नसतं. शिकार यांच्या नजरेतून हवा, पाणी आणि जमिनीवरूनही वाचू शकत नाही. यांच्यासमोर शिकार आली तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. मात्र, अनेकदा शिकार या प्राण्यांच्या हाती लागत नाही. मात्र, तरीही हे प्राणी अगदी शेवटपर्य़ंत प्रयत्न करत राहतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video of Jaguar) होत आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या पाण्यात अगदी खोलवर जातो. तो आपल्या पंजाने पाण्याच्या आत आपली शिकार पकडण्याचा प्रयत्न करतो. मग तो शिकार आपल्या जबड्यात पकडतो. हा व्हिडिओ पाहून इतकं तर नक्कीच समजतं की बिबट्या जितके चांगले शिकारी असतात तितकंच चांगलं त्यांना पोहायलाही येतं. कुत्र्याला तोंडाने श्वास द्यायला गेली व्यक्ती अन्…; पुढे काय घडलं पाहा VIDEO हा व्हिडिओ ट्विटरवर @AmazingNature00 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, बिबट्या एक चांगला शिकारी आणि उत्तम जलतरणपटूही आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 11 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मांजराला पाण्यात शिकार करताना पाहिलं. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, बिबट्या पाण्याच्या आत जात मासा, बेडूक आणि मगरीचीही शिकार करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात