मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पैसे अन् पिशवी घेऊन बाजारात पोहोचला कुत्रा; शॉपिंगचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

पैसे अन् पिशवी घेऊन बाजारात पोहोचला कुत्रा; शॉपिंगचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO

तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? बहुतेकांचं उत्तर हे नाही असंच असेल.

तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? बहुतेकांचं उत्तर हे नाही असंच असेल.

तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? बहुतेकांचं उत्तर हे नाही असंच असेल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 सप्टेंबर : प्राण्यांची आवड असणारे व्यक्ती आपला बराच वेळ इंटरनेटवर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ (Video of Animals) पाहण्यात घालवतात. आपण सर्वांनी माकड, मांजर, कुत्रा अशा प्राण्यांना इकडून तिकडे उड्या मारताना आणि फिरताना अनेकदा पाहिलं असेल. ट्रेनिंगनंतर परफॉर्म करणाऱ्या अनेक प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत असतात. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? बहुतेकांचं उत्तर हे नाही असंच असेल. कारण असं करण्यासाठी फळ तसंच भाज्या निवडण्याची समज आणि पैसे मोजता येणं गरजेचं आहे. मात्र, इंटरनेटवर असा व्हिडिओ उपलब्ध आहे, ज्यात चक्क एक कुत्रा भाजी खरेदी करण्यासाठी निघाल्याचं दिसतं (Dog Buying Fruits in Market). हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

चाललंय तरी काय? भरमंडपातच मेहुणीने नवरदेवाला केला असा इशारा; VIDEO VIRAL

प्राण्यांवर विशेष प्रेम असणारे लोक आपल्या पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच ठेवतात. हे प्राणीही आपल्या मालकाच्या मदतीसाठी शक्य तितका प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात एक कुत्रा फळं खरेदी करताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे हा कुत्रा रोज मार्केटमध्ये येऊन आपल्या मालकासाठी आणि मालकाच्या कुटुंबीयांसाठी फळ तसंच भाजीपाला खरेदी करतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा आपल्या दातांच्या मदतीनं तोंडात बास्केट घेऊन येतो आणि फळं निवडू लागतो. बास्केटमध्येच पैसेही ठेवलेले असतात. विक्रेता हे पैसे घेतो आणि डॉगीला सामान देतो. इतकंच नाही तर दुकानदारानं पैसे घेतल्यानंतर उरलेले पैसे परत घेण्यासाठीही हा कुत्रा तिथेच वाट बघत बसतो.

बापरे! महाकाय सापाने तरुणाला घातला वेटोळा आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

बाजारात शॉपिंग करणाऱ्या या कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. फेसबुकवर हा व्हिडिओ Woof Woof नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 20 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी या कुत्र्याच्या हुशारीचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Dog, Video Viral On Social Media