मुंबई, 02 सप्टेंबर : लग्न
(Wedding video) म्हणजे नवरा-नवरीप्रमाणेच
(Groom bride video) नवरदेव आणि मेहुणीची जोडीही चर्चेत असतेच. मेहुणी
(Sister in law) नवरदेवाला
(Brother in law) सतवण्याची एक संधी सोडत नाही. पण मजेमजेत मेहुणी
(Jija saali video) नकळत असं काही करून जाताच जे पाहून आपल्याला मात्र धक्का बसतो. अशाच लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर
(Social media) व्हायरल
(Viral video) होतो आहे.
मेहुणीने भरमंडपात नवरदेवाला असा इशारा केला आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मेहुणी आणि नवरदेवाचे न बोलता फक्त डोळ्यांनीच इशारे सुरू आहेत. नवरीलासुद्धा याची कल्पना नाही आहे.
व्हिडीओत पाहू शकता वरमाला घालण्याचा विधी सुरू आहे. एकमेकांना वरमाला घालण्यासाठी नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईकही आहेत. नवरीच्या मागे तिची बहीण म्हणजे नवरदेवाची मेहुणी उभी आहे. ती आपल्या बहिणीच्या मागे राहून नवरदेवाला इशारे करताना दिसते आहे. काहीच न बोलता फक्त डोळ्यांनी खुणावत ती नवरदेवाला काहीतरी सांगते आहे.
हे वाचा - मेहुणीने सर्वांसमोरच केली नको ती मस्करी, नवरदेवालाही वाटली लाज; Video viral
नवरदेवसुद्धा मेहुणीकडे पाहतच राहतो. नंतर तो नवरीला वरमाला घालायला जातो, तेव्हा मेहुणी नवरीला आपल्या दिशेने म्हणजे मागे खेचून घेते. त्यामुळे नवरदेवाला नवरीला वरमाला घालायला जमत नाही. वरमाला घालता घालता नवरदेव अक्षरशः नवरीवर पडतोच. मेहुणी नवरदेवाला इशारे करत हेच सांगत असते की ती वरमाला घालायला देणार नाही आणि ती तसं करूनही दाखवते. पण तिच्या चेहऱ्यावरील एक्प्रेसशने आणि इशाऱ्यांनी सुरुवातीला मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
हे वाचा - VIDEO - लग्नात नवरदेवाला बसला 'जोर का झटका'; नवरीला पाहताच पुरता हादरला
मुनिराज जीटी नावाच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.