व्हिडीओत पाहू शकता ब्रेवर एका बॉक्समधून या भल्यामोठ्या सापाला बाहेर काढतात. हा साप इतका मोठा आणि जड आहे की त्याला उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ब्रेवरला आणखी काही लोकांची मदत लागते. हे वाचा - मासे पकडायला गेला पण माशानेच पाण्यात खेचून घेतलं आणि...; धडकी भरवणारा VIDEO त्या सापाला उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं. इथं पाहू शकता एका तरुणाला जमिनीवर झोपवलेलं आहे. त्याचे डोळे झाकण्यात आले आहेत. या सापला त्या तरुणाच्या अंगावर सोडलं जातं. त्यानंतर हळूहळू करत हा साप त्या तरुणाला वेटोळे घालतो. तरुण सापासह बाहेर येतो. सापाने त्याच्या शरीराला विळखा घातलेला आहे. तरुण तसाच उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतं आहे पण भीतीसुद्धा दिसून येते. साहजिकच इतका मोठा साप फक्त पाहून आपल्याला धडकी भरली आहे, या तरुणाच्या अंगावर तर हा साप सोडण्यात आला आहे, त्याचं काय होत असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. हे वाचा - खरं की काय? इथे सफाई कामगारांऐवजी माश्या ठेवतात टॉयलेट स्वच्छ; वाचून व्हाल थक्क इन्स्टाग्राम पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार या सापाचा नाव माय लव्ह आहे. जगातील सर्वात सुंदर सापांपैकी एक हा साप आहे. जेव्हा या सापावर सूर्याची किरणं पडतात तेव्हा त्या सापाला पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. हा साप सर्वात चांगला साप आहे, म्हणजे त्याच्यापासून फार धोका नाही. त्यामुळे जेव्हा डोळे झाकलेल्या माझ्या एका मित्रावर या सापाला सोडायला सांगण्यात आलं तेव्हा आम्ही तसं केलं, असं ब्रेवर यांनी या पोस्टमध्ये सांगितलं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos