मुंबई, 25 मार्च : दोन मांजरी किंवा दोन श्वान आपसात भिडले तरी त्यांच्यातील भांडण सोडवण्याची हिंमत अनेकदा आपलीही होत नाही. रागात ते आपल्यावर हल्ला करतील अशी भीती आपल्यालाही वाटतं. विचार करा या मांजर-श्वानांऐवजी वाघ, सिंह असे खतरनाक प्राणी आपसात जुंपले तर… या प्राण्यांसमोर तसंही माणूस काय कोणता प्राणीही जाण्याची हिंमत करत नाही. मग त्यांच्यातील फायटिंग थांबवणं तर दूरच. पण तुम्ही आम्ही किंवा इतर कोणताही प्राणी विचारही करणार नाही ते एका साध्या श्वानाने केलं. वाघ आणि सिंहांच्या भांडणात तो मध्ये पडला. वाघ, सिंह आणि श्वानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. वाघ आणि सिंह एकमेकांच्या समोर आले आणि त्यांच्यात जुंपली. दोघंही चवताळले आणि एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. वाघ सिंहावर आणि सिंह वाघावर हल्ला करत होता, दोघंही मागे हटायला किंवा हार मानायला तयार नाहीत. त्यांच्यातील भांडण पाहून एक श्वान त्यांच्यामध्ये पडला. वाघ आणि सिंहाचं भांडण तो सोडवायला गेला. त्याचं काय झालं ते तुम्हीच या व्हिडीओत पाहा. VIDEO - पिकनिक स्पॉटवर आली मगर; शिकार सोडून जे पळवलं ते पाहून व्हाल थक्क व्हिडीओत तुम्ही पाहिलं तर वाघ-सिंहांची फायटिंग पाहूनच आपल्याला धडकी भरते. श्वान त्या दोघांच्या मध्ये जातो आणि त्यांचं भांडण थांबवण्याचा, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. जसा श्वान मध्ये येतो. तसा काही वेळ वाघ-सिंह शांत होतात. पण पुन्हा ते भांडू लागतात. ते जितक्या वेळा भांडतात, तितक्या वेळा श्वान ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. अखेर तो या प्रयत्नात यशस्वीही झालेला दिसतो. त्याच्या मध्यस्थीमुळे वाघ आणि सिंहांचं भांडण थांबतं.
प्राण्यांचे बरेच व्हिडीओत सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे तुम्ही पाहिले असतील. पण असा व्हिडीओ कदाचित पाहिला नसेल. श्वानाच्या डेअरिंगला दाद द्यायला हवी. आपल्याच पिल्लांची शिकार करतात हे 7 जीव, जन्म देताच त्यांना खातात; कारणही शॉकिंग animalszick इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.