मुंबई, 23 मार्च : मगरीचे बरेच व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होत असतात. सामान्यपणे यात तुम्ही मगरीला शिकार करताना पाहता. पण सध्या मगरीचा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात मगर शिकारीसाठी आली. पण शिकार सोडून तिने दुसरंच काहीतरी पळवलं आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
एरवी शिकाऱ्यावर तुटून पडणाऱ्या मगरीचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. एका पिकनिक स्पॉटवरील हा व्हिडीओ आहे. काही लोक नदीकिनारी पिकनिकला गेले. तिथे ते बसले असताना नदीतून अचानक एक मगर बाहेर आली. पण तिने माणसांवर हल्ला केला नाही. तर दुसरंच काहीतरी केलं.
VIDEO - श्वानांनी खतरनाक मगरीची धरली पाठ; तुम्ही विचारही केला नसाल असा शॉकिंग शेवट
व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात पिकनिकला गेलेल्या लोकांनी खाण्याचं काही सामान बाहेर काढून ठेवलं आहे. इतक्यात तिथं मगर येते. तिला घाबरून सर्वजण सामान तिथंच सोडून दूर पळून जातात. मगरीपासून ते लांब होतात. मगर त्या सामानजवळ येते, सर्वकाही नीट पाहते. शेवटी ती खाद्यपदार्थ भरलेला असलेला बॉक्स तोंडात धरते आणि पळवून नदीत घेऊन जाते.
शेवटी तुम्ही पाहाल जशी ही मगर पाण्यात जाते तशी तिच्याजवळ दुसरी मगर येते. ती त्या मगरीच्या तोंडातील बॉक्स हिसकावण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर दोघांमध्ये बॉक्ससाठी जुंपते.
पॉवर ऑफ 'आईची चप्पल'! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO
लेटेस्ट सायथिंग्स फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal