आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील सगळे प्राणी एक प्रकारच्या पिंजऱ्यातच कैद आहेत. इथे एक सिंह, वाघ आणि कुत्रा दिसत आहे. हे ऐकूनच कोणीही आश्चर्यचकीत होईल. मात्र पुढे जे घडतं ते जास्तच थक्क करणारं होतं. यात दिसतं की कुत्रा अचानक वाघाच्या जबड्यावर हल्ला करून जबडा आपल्या तोंडात पकडण्याचा प्रयत्न करतो. या दोघांमधील लढाई मस्तीमध्ये सुरू असल्याचं जाणवतं. मात्र, नंतर चक्क वाघच कुत्र्याला घाबरून त्याच्यापासून लांब पळताना दिसतो. विशेष म्हणजे तो एकदाही कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाही. हे पाहून असं वाटतं जणू तो कुत्र्याला घाबरत आहे. दुसरीकडे सिंहही काहीही न करता, हे सगळं पाहत बसला आहे. कुत्र्याचं पिल्लू समजून जोडप्याने घरी आणला भयंकर प्राणी; 24 तासातच लक्षात आली चूक, पण... या व्हिडिओला 18 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यावरील कमेंट अतिशय मजेशीर आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, आपल्या गल्लीत कुत्राही सिंह असतो, ही ओळ खरी ठरली. आणखी एकाने लिहिलं, की कुत्रा नशेत आहे. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, की प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Tiger attack