Home /News /viral /

व्यक्तीच्या तळहातावर उभा राहून चिमुकलीने मारली जबरदस्त बॅकफ्लिप; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

व्यक्तीच्या तळहातावर उभा राहून चिमुकलीने मारली जबरदस्त बॅकफ्लिप; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मुलगी अप्रतिम आणि सहज बॅकफ्लिप (Backflip Video of a Girl) करताना दिसते. या गोष्टी करताना मोठ्या माणसांनाही घाम फुटेल मात्र चिमुकली अगदी सहज हे करून दाखवते.

  नवी दिल्ली 08 मे : आजकालची लहान मुलं अनेकदा मोठ्यांना जमणार नाही अशा काही गोष्टी करून दाखवतात. कोवळ्या वयातच ते असे कारनामे करतात की लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित तर होतातच आणि तोंडात बोटंही घालतात. आजकाल क्वचितच असं कोणतं काम असेल जे लहान मुलांना करता येत नाही. त्यांच्यात टॅलेंट भरपूर असतं आणि स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर ते अगदी लहान वयातच जगात नाव कमावतात. 6 महिन्यानंतर रुग्णालयातून घरी परतली पत्नी; वृद्ध पतीची प्रतिक्रिया पाहून पाणावतील डोळे, Emotional Video गायनाचा मंच असो वा नृत्य किंवा कोणताही पराक्रम, आता लहान मुलंही ते आरामात करताना दिसतात. याचा प्रत्यय देणारे अनेक व्हिडिओ (Viral Video) अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यात मुलांचं जबरदस्त टॅलेन्ट आणि कला पाहण्याची संधी मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लहान मुलीने असा पराक्रम करून दाखवला, की बघणारे थक्क झाले आहेत.
  व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आश्चर्यकारक स्टंट करताना दिसते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मुलगी अप्रतिम आणि सहज बॅकफ्लिप (Backflip Video of a Girl) करताना दिसते. या गोष्टी करताना मोठ्या माणसांनाही घाम फुटेल मात्र चिमुकली अगदी सहज हे करून दाखवते. दुसऱ्या सीनमध्ये ही मुलगी एका माणसाच्या हातावर ताठ उभी राहून हवेत बॅकफ्लिप मारताना दिसते. हे अतिशय कठीण असल्याचं व्हिडिओ पाहून जाणवतं. हे करून दाखवण्यासाठी लोकांना वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. मात्र या चिमुकलीचं तर वयही अतिशय कमी आहे. अशात तिने इतक्या लहान वयात किती सराव केला असेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. मंडपात नवरीनं विचारलं, तुला लग्न का करायचंय? उत्तर ऐकून तिनं असा काही चेहरा केला की.. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर youradventuregram नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे आणि 'अमेझिंग गर्ल' असं कॅप्शन त्याला दिलं गेलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. यासोबतच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'एवढ्या कमी वयात असा पराक्रम... एकदम अप्रतिम', तर इतर अनेक यूजर्सनी मुलीचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Stunt video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या